Baramulla Terrorist Arrest : जम्मूच्या बारामुल्ला भागात पोलिसांची मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

Jammu Kashmir News : चक टप्पर येथे सुरक्षा दलांनी संयुक्त नाकाबंदी केली होती.
Baramulla Terrorist Arrest :
Baramulla Terrorist Arrest :Sarkarnama
Published on
Updated on

Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या भर्ती मोड्यूलचा पर्दाफाश करत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हातबॉम्ब आणि AK-47 चे 30 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

बारामुल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक टप्पर येथे सुरक्षा दलांनी संयुक्त नाकाबंदी केली होती. या वेळी एका महिलेसह तीन संशयित व्यक्ती चक टप्पर येथून क्रेरीकडे पायी जात असल्याचे दिसले. त्यांच्या झडतीदरम्यान 3 चिनी बनावटीचे हातबॉम्ब आणि 30 एके-47 काडतुसे जप्त करण्यात आली. लतिफ अहमद दार, शौकत अहमद लोन आणि इशरत रसूल अशी तिघांची नावे आहेत. (Jammu Kashmir News)

Baramulla Terrorist Arrest :
G-20 Conference : तीन आठवड्यात सगळी कामे पुर्ण करा, हलगर्जीपणा सहन करणार नाही...

बारामुल्ला येथे राहणारे हे तीन दहशतवादी लष्करचे मदतनीस असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले. त्यांनी क्रेरीच्या सामान्य परिसरात चार तरुणांना ओळखले होते आणि ते त्यांना सक्रिय करून नजीकच्या काळात दहशतवादी संघटनेत सामील होणार होते. अटक करण्यात आलेले तिघेजण क्रेरी येथील सामान्य भागातील भरती मॉड्यूलचे सूत्रधार होते. उमर लोन आणि एफटी उस्मान या सक्रिय दहशतवाद्यांच्या संपर्कातही होता. (Terrorist Attack)

10 सप्टेंबरला लष्कर-ए- तैयबाच्या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून हातबॉम्ब, काडतुसे आणि काही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध यूएपीए आणि आर्म्स अॅक्टच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Baramulla Terrorist Arrest :
Cm Eknath Shinde In Kashmir News : मुख्यमंत्री शिंदे कुटुंबासह काश्मिर दौऱ्यावर, `महाराष्ट्र भवन` उभारण्यासाठी जागा मागितली..

अलीकडेच बडगाम पोलिसांनी लष्कराच्या साथील पाखरपोरा भागात एका दहशतवाद्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी पोखरपोरा भागात लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅगझिन आणि इतर गुन्हेगारी साहित्यासह शस्त्रास्त्रे तसेच दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

यापूर्वीही कुलगाम जिल्ह्यातही दहशतवादी भरती मोड्यूल समोर आले होते. यामध्ये काश्मीरच्या केंद्रीय विद्यापीठातील पीएचडी स्कॉलरचाही समावेश होता. या प्रकरणी हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन दहशतवादी साथीदारांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By-Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com