Cm Eknath Shinde In Kashmir News : मुख्यमंत्री शिंदे कुटुंबासह काश्मिर दौऱ्यावर, `महाराष्ट्र भवन` उभारण्यासाठी जागा मागितली..

Jammu-kashmir : 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगर येथे जागा देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली.
Cm Eknath Shinde In Kashmir News
Cm Eknath Shinde In Kashmir NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री कुठे गेले ? याची चर्चा राज्यात सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल नांदेडमध्ये सभा झाली, त्याआधीपासूनच मुख्यमंत्री कुटुंबासोबत राज्याबाहेर गेल्याची चर्चा होती. (Cm Eknath Shinde In Kashmir News) अखेर मुख्यमंत्री कुटुंबासह जम्मू-कश्मिर दौऱ्यावर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनाला ते जाणार असल्याची चर्चा होती अखेर ती खरी ठरली आहे.

Cm Eknath Shinde In Kashmir News
Central Minister Bhupendra Yadav : केंद्रात पुन्हा मोदी सरकारच, मतदारांचा तोच आग्रह..

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी जम्मू-कश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची देखील भेट घेतली. (Jammu-Kashmir) कश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे राज्यपाल सिन्हा यांच्याकडे केली आहे. आज श्रीनगर येथेही भेट झाली.

'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगर येथे जागा देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. (Maharashtra) खासदार राज्यपालांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले आहे की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल.

श्रीनगर मधील हे 'महाराष्ट्र भवन' केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असेही शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com