Modi Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलात काहींना डच्चू मिळणार; भाजपचे विद्यमान मंत्री नाराज होणार..

Modi Government Cabinet Expansion: काही विद्यमान मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा प्लॅन भाजपच असल्याचे दिसते.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Cabinet Expansion News: महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात अजून कुणाला स्थान मिळणार ही चर्चा सुरु असताना केंद्रातील मोदींच्या मंत्रीमंडळाच्या मोठा फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विविध राज्यांत सध्याची राजकीय परिस्थिती, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) यामुळे देशातील राजकीय परिस्थिती बदलल्याचे भाजपचे निरीक्षण आहे.

या पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थिती आगामी लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. त्यासाठी रणनीती ठरविण्यात येत आहे. मंत्रीमंडळ विस्तार करताना काही विद्यमान मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा प्लॅन भाजपच असल्याचे दिसते.

Narendra Modi, Amit Shah
Nashik Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ; आमदार सुहास कांदेंची ताकद वाढली..ठाकरेंच्या निष्ठावंतांचा शिवसेनेत प्रवेश

केद्रींय मंत्रीमंडळाच्या विस्तारापूर्वी भाजप पक्षश्रेष्ठींच्या बैठकांच्या सिलसिला सुरु आहे. विद्यमान मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे, त्यांचे 'प्रगतीपुस्तक' पंतप्रधान मोदी हे पाहात आहेत. गृहमंत्री अमित शाह, अध्यत्र जेपी नड्डा (JP Nadda) आणि भाजपच्या एकूणच धुरीणांना याबाबत वेळीच काही बदल करणे आवश्यक असल्याचा सांगितले आहे.

Narendra Modi, Amit Shah
Sharad Pawar Meeting in Delhi : अजितदादांच्या बंडानंतर शरद पवार अँक्शन मोडमध्ये ; आज दिल्लीत संघटनात्मक पातळीवर..

मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, तर काहींच्या खात्यांची खांदेपालट होऊन रिक्त जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही संधीसुद्धा एक राजकीय तडजोडच असण्याची शक्यता असल्याचे समजते.

गेल्या वर्षभरात अनेक राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत.महाराष्ट्रात नव्याने सोबत आलेला अजित पवार गट, अगोदरच सत्तेत असलेला शिंदे गट, उत्तर प्रदेशमध्ये ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, जीतन मांझी यांचा हुंदुस्तान आवाम मोर्चा, कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष), पंजाबचा शिरोमणी अकाली दल या पक्षांनाही भाजपला सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजप आणि केंद्रीय नेतृत्वाला मंत्रिमंडळ विस्तार केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र या फेरबदलामुळे विद्यमान मंत्र्यांच्या नाराजी नाट्याला पक्षश्रेष्ठींना सामोरे जावे लागणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com