Rohini Salian News : ‘मालेगाव’वर तत्कालीन सरकारी वकिलांचे धक्कादायक विधान; म्हणाल्या, खूप पुरावे सादर केले होते, ते कुठे गायब झाले?

Background of the Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुरूवातीला काही वर्षे रोहिणी सालियन या विशेष सरकारी वकील म्हणून कोर्टात सरकारची बाजू मांडत होत्या.
Sadhvi Pradnya Singh
Sadhvi Pradnya SinghSarkarnama
Published on
Updated on

Rohini Salian’s Role as Special Public Prosecutor : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरूवारी आला. विशेष एनआयए कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील तत्कालीन सरकारी वकील रोहिणी सालियन पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आरोपींबाबत ‘सॉफ्ट’ होण्यासाठी एनआयएचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी 2015 मध्ये केला होता. आता निकालनंतर त्यांनी धक्कादायक विधान केले आहे.

माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल अपेक्षितच होता, असे सालियन यांनी म्हटले आहे. निकालानंतर ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, असेच होणार हे माहिती होते. खरे पुरावे सादर केले नाहीत तर दुसरी काय अपेक्षा करणार?

न्यायालयात अंतिम पुरावे सादर करताना मी त्यावेळी सरकारी वकील नव्हते. मी 2017 पासून बाहेर होते. त्याआधी मी खूप पुरावे सादर केले होते आणि कोर्टानेही ते मान्य केले होते. ते कुठे गायब झाले?, असे धक्कादायक विधान सालियन यांनी केले आहे.

बऱ्याच काळापासून मी या निकालाची वाट पाहत होते. सुरूवातीला सादर केलेल्या पुराव्यांवेक्षा वेगळे पुरावे तुम्ही सादर केले तर काहीही होऊ शकते. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आधीचे पुरावे खोटे होते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा केला, पुन्हा साक्षीदारांचे जबाब नोंदवले, जे एटीएसने आधी नोंदवलेल्या 164  च्या विरोधाभासी होते. एनआयएने सादर केलेल्या नवीन पुराव्यांच्या आधारावर हा निकाल आहे, असे सालियन यांनी म्हटले आहे.

माझ्यासाठी हे नेहमीचे झाल्याचे सांगत सालियन यांनी या निकालामुळे निराश नसल्याचेही सांगितले. असे सातत्याने होत राहिले तर आपण आपली संवेदनशीलता गमावून बसतो. सत्य समोर यावे, असे कुणालाच वाटत नाही. आपण खूप मेहनत घेतो, पण कुणाच्यातरी तशी इच्छा नसते. शेवटी हे कुणाचे अपयश, आपले-लोकांचे. सरकारचे नाही कारण हे सरकार लोकांनीच निवडून दिले आहे. त्यांना हवे तसे ते राज्य करतील. तुम्ही सरकारला नव्हे स्वतःला दोष द्यावा, अशी भावना सालियन यांनी निकालानंतर व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com