Mallikarjun Kharge and Ghanshyam Tiwari News : संसद सत्रात बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते खर्गे अचानक भावूक झाले. मंगळवारी राज्यसभेत भाजप नेते घनश्याम तिवारींनी खर्गेंवर टिप्पणी केली होती, ज्यामुळे ते प्रचंड दुखावले गेले आणि नाराज झाले होते.
मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी बुधवारी भावूक होत सभापतींकडे भाजप खासदार घनश्याम तिवारींद्वारे त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत सभागृहात केल्या गेलेल्या टिप्पण्या रेकॉर्डवरून हटवण्याची आग्रही मागणीही केली. यावर सभापती जगदीप धनखड यांनी म्हटले की, ते घनश्याम तिवारींद्वारे मंगळवारी सभागृहात करण्यात आलेल्या टिप्पण्यांकडे लक्ष देतील आणि आश्वासन दिलं की खर्गे यांना दुखावणारी कोणतीही बाब रेकॉर्डवर राहणार नाही.
भाजप(BJP) खासदार घनश्याम तिवारींनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर काही टिप्पणी केली होती आणि त्यांच्यावर परिवारवादाचा आरोपही केला होता. आज जेव्हा राज्यसभेची कार्यवाही सुरू झाली तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे आपल्या जागेवरून उभा राहिले आणि त्यांनी म्हटले की आई-वडिलांनी त्यांचे नाव अतिशय विचारपूर्वक ठेवले होते.
खर्गे म्हणाले की, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्यांच्या मुलाचं नाव असावं. घनश्याम तिवारींना त्यांच्या नावाची काय अडचण आहे, जे त्यांनी अशी टिप्पणी केली? खर्गेंनी असंही म्हटलं की तिवारींनी परिवारवादाचाही आरोप केला आहे, मात्र मी तर माझ्या कुटुंबातून राजकारणात आलेला पहिलाच व्यक्ती आहे. तसेच, मी काल जेव्हा सभागृहात नव्हतो तेव्हा तिवारींनी एक मुद्दा उपस्थित केला आणि माझ्यावर परिवारवादाचा आरोप केला. मी त्यांना सांगू इच्छितो की राजकारणात माझी पहिलीच पिढी आहे. याआधी माझे वडील नव्हते, आई नव्हती. आई नंतर मला वडिलांनी मला वाढवलं, इथंपर्यंत मी त्यांच्याच आशीर्वादाने पोहचलो आहे.
राज्यसभेत आपलं म्हणणं मांडताना खर्गेंचा कंठ दाटून आला. यावेळी त्यांनी हेही म्हटले की, सभापती महोदय मी या वातावरणात आणखी जिवंत नाही राहू इच्छित. यावर सभापती धनखड म्हणाले की, तुम्ही अजून खूप जगणार आहे, तुम्ही याही पुढे जाल.
खर्गेंनी पुढे सांगितलं की, मला वाईट वाटलं की तिवारींनी म्हटलं मी परिवारवादी आहे. मल्लिकार्जुन शंकराचे नाव आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. माझ्या वडिलांनी अतिशय विचारपूर्वक माझे नाव ठेवले होते. मी एकटाच माझ्या कुटुंबातून राजकारणातून आलो आहे. मला नाही माहीत त्यांना काय अडचण आहे, माझ्याबाबत असं का बोलले?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहास सांगितले की, भाजप खासदार घनश्याम तिवारींनी म्हणाले की, त्यांचे नाव मल्लिकार्जुन आहे, जे शिवाचे नाव आहे. त्यांचे नाव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तिवारींच्या याच विधानावर मल्लिकार्जुन खर्गे नाराज झाले. त्यांनी म्हटले हे नाव माझ्या वडिलांनी विचारपूर्वक ठेवले आहे. मला नाही माहिती की तिवारींन असं का म्हटलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.