MP Election News : 'पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. आमच्या पक्षाचे नेते पक्षाचा प्रचार करत आहेत. भाजप आमच्या उमेदवारांवर आणि त्यांच्या नातेवाइकांवर ईडी आणि आयकर विभागाच्या माध्यमातून हल्ले करत आहेत.
मी म्हणतोय की, या निवडणुकीत एका विधानसभा मतदारसंघातून आमचा एक उमेदवार उभा आहे, मात्र भाजपने आमच्या एका उमेदवाराच्या विरोधात तीन उमेदवार उभे केले आहेत. जर तुम्ही विचाराल की ते कोण आहेत, एक ईडी, दुसरा इन्कम टॅक्स आणि तिसरा सीबीआय, अशा शब्दांत काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला.
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे खर्गे बोलत होते. या वेळी खर्गे म्हणाले, 'भाजपने हिंदूंचा ठेका घेतला आहे का ? आपण हिंदू नाही का ? माझे नाव मल्लिकार्जुन आहे ज्याचा अर्थ शिव आहे. भाजपचे लोक आमच्या उमेदवारांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात, तसेच लोकांनाही घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि काँग्रेसला मत देऊ नका असे सांगतात.
मात्र, छत्तीसगडमधील जनता घाबरलेली नाही. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच येथे आले होते आणि त्यांनी सांगितले, येथे सण साजरे करणे कठीण आहे. कोणता सण साजरा करणे कठीण आहे ? लोकांना चिथावणी देण्यासाठी ते असे म्हणाले.
खर्गे म्हणाले, 'ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचे भवितव्य बदलून टाकणारी निवडणूक आहे. हे खूप महत्त्वाचे आहे कारण भाजप सरकार, मोदी जी आणि आरएसएस यांना देशातील संविधान बदलायचे आहे.
गरिबांना जे अधिकार मिळत आहेत, जे वंचितांना संविधानातून मिळत आहेत ते ते बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाचा पाच राज्यांत विजय होणे आवश्यक आहे.
भाजप समाज तोडत असून, मतांसाठी त्यांना भांडायला लावत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. दरम्यान, छत्तीसगडच्या 90 सदस्यीय विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी मंगळवारी मतदान संपले. इतर 70 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.