Akola Corporation : ठाकरे गटानं गाजवला दिवस, तिसऱ्या आंदोलनानं प्रशासनात तणावाचा कळस

Uddhav Thackeray Group : शहर प्रमुख राजेश मिश्रा यांची महापालिकेवर धडक
Thackeray Group Protest in Akola
Thackeray Group Protest in AkolaSarkarnama
Published on
Updated on

Sensation in Cotton City : अकोला पोलिस आणि प्रशासनाच्या दृष्टीनं गुरुवारचा (ता. ९) दिवस तणावाचा कळस गाठणारा ठरला. दिवाळीमुळं बाजारात असलेली गर्दी नियंत्रणात ठेवता ठेवता पोलिसांची दमछाक होत असताना एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनांमुळं पोलिस आणि प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी झाली.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवेसना उद्धव ठाकरे गटानं अकोला शहर आणि पातूरमध्ये विमा कार्यालयांची तोडफोड केली. दुसरीकडं आमदार अमोल मिटकरी यांनी हॉकर्सला घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक राजेश मिश्राही अकोला महापालिकेवर धडकले. (Four Protest in Akola on same day by Shivsena Uddhav Thackeray group & NCP Ajit Pawar Group's MLA created Sensation)

शहरात वाढता डेंग्यूचा प्रभाव, स्वच्छता नसणे, पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, ऐन दिवाळीत बंद असलेले पथदिवे यामुळं संतापलेल्या राजेश मिश्रा यांनी गुरुवारी महापालिकेवर धडक दिली. बसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस असल्यानं बाजारात खरेदीसाठी चांगलीच गर्दी होती. अशात घोषणाबाजी करीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी मनपावर धडकल्यानं बाजारात खळबळ उडाली.

ठाकरे गटाचे मिश्रा यांच्यासह राहुल कराळे, गजानन बोराळे, मंगेश काळे, गजानन चव्हाण, नितीन तथोड, सागर भारुका, नितीन मिश्रा, आकाश राऊत, मनोज बावीस्कर, संतोष रणपिसे, सागर कुकडे, प्रकाश वानखडे, सुनील दुर्गीय, रोशन राज, सतीश नागदिवे आदी घोषणाबाजी करीत महापालिका अधिकाऱ्यांच्या कक्षांमध्ये शिरले. अधिकाऱ्यांच्या खुर्चांवर त्यांनी निषेधाचे पोस्टर्स चिटकवत परिसर दणाणून सोडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घटनेची माहिती महापालिकेच्या सुरक्षा विभागानं पोलिसांना दिली. पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या सततच्या आंदोलनांमुळं थकलेले कोतवाली पोलिस माहिती मिळताच महापालिकेकडं धावले. पोलिसांनी मनपाचे मुख्यालय गाठत अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षित केलं. या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. महापालिका सध्या बरखास्त असल्यानं येथे प्रशासक राज सुरू आहे. आंदोलकांनी या वेळी मनपा आयुक्तांवरही ताशेरे ओढले. अधिकाऱ्यांनी समस्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर मिश्रा व त्यांचे सोबती माघारी फिरले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट पुन्हा अकोला शहरात आक्रमक झालाय. वेगवेगळ्या मुद्द्यांवर नेत्यांकडून सुरू असलेलं आंदोलन, धरणे, मोर्चे, ठिय्या आंदोलन, घेराओ यामुळं ठाकरे गटा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. यापैकी अनेक आंदोलनांच्या माध्यमातून या गटानं भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवलाय. त्यात महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षही अधूनमधून पाठिंबा देत असतात. मात्र, अकोला जिल्ह्यात सध्या ठाकरे गट विरुद्ध भाजप असाच सामना खऱ्या अर्थानं रंगतोय.

Edited by : Prasannaa Jakate

Thackeray Group Protest in Akola
Akola Vandalism : पीकविम्याच्या मुद्द्यावर अकोल्यात ठाकरेंचे कार्यकर्ते चिडले; कार्यालय गाठत सर्व साहित्य फोडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com