Nitin Raut Latest News : मल्लिकार्जुन खर्गेंनी दिली नितीन राऊतांवर मोठी जबाबदारी!

Gujrat News : काँग्रेस शोधणर पराभवाची कारणे!
Gujrat News
Gujrat NewsSarkarnama
Published on
Updated on

Gujrat : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले होते, तर काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर काँग्रेसला इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. केवळ १७ जागांवरच काँग्रेसला समाधान मानावे लागले. आता या पराभवाच्या मागची कारणं शोधण्यासाठी, निकालाचे मूल्यमापन करण्यासाठी काँग्रेसकडून तथ्य शोध समिता स्थापन केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळाले. १८२ जागा असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला दिडशेच्या पार जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्ये भाजपने पुन्हा एकदा दैदिप्यमान यश मिळवले. भाजपने १८२ पैकी तब्बल १५६ जागा आणि तब्बल ५३ % मते मिळवत आपला बालेकिल्ला अभेद्य आहे हेच दाखवून दिले.

Gujrat News
Mumbai News : शिंदे-फडणवीसांची खेळी; मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी देवेन भारती!

२०१७ गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला घाम फोडत काँग्रेसने नेत्रदिपक कामगिरी केली होती. एकूण ७७ जागा मिळवत,भाजपलाही दोनअंकी जागेवर आणले होते. मात्र हीच कामगिरी २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसला करता आले नाही. काँग्रेसला आपल्या मागील निवडणुकीतील जागाही राखता आले नाही. निवडणुकीच्या इतिहासातील, सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जात काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू होती, याचा प्रभाव गुजरात विधानसभा निवडणुकीत दिसेल, असे बोलले जात होते. मात्र ही अपेक्षा पूर्ण फोल ठरली.

Gujrat News
Sammed Shikhar Controversy : सम्मेद शिखराच्या वादाचे नक्की कारण काय? वाचा सविस्तर

गुजरात निवडणुकीत तिसरा खेळाडू म्हणून उतरलेल्या आम आदमी पार्टीने ५ जागा मिळवत व एकूण १२ ते १३ टक्के मते घेतली होती. त्यामळे 'आप'ला इतक्या प्रमाणात मते कशी मिळाली, हा सुद्धा प्रश्न काँग्रेससमोर आहे. या सर्व प्रश्नांबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तीन सदस्यीय तथ्य शोध समिती स्थापन केली आहे. गुजरात निकालांचे मूल्यमापन, पराभवाची कारणे यासाठी तथ्य शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com