Mumbai News  | Devendra Fadanvis | Eknath Shinde
Mumbai News | Devendra Fadanvis | Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : शिंदे-फडणवीसांची खेळी; मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी देवेन भारती!

Mumbai News : मुंबईवर नियंत्रण राहण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खेळी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
Published on

मुंबई : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबईसाठी फक्त पोलीस आयुक्त पद होते. देवेन भारती हे मुखमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. यामुळे आता फक्त भारती यांच्यासाठी व मुंबईवर आपले नियंत्रण राहावे, यासाठी हे पद निर्माण करण्यात आले आहे का? अशी चर्चा होत आहे.

देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि मर्जीतले अधिकारी समजले जातात. यामुळेच नव्याने, पहिल्यांदाच मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करून त्यांना या पदावर आणले गेले आहे, अशी चर्चा आहे. विशेष पोलीस आयुक्तपदासाठी, थेट शासनाच्या वतीने आदेश काढण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com