Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. एकीकडे हे मतदान सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिमला येथे पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी 'I.N.D.I.A'आघाडीचे पंतप्रधान कोण? असा प्रश्न केला, ज्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले, ज्याची आता राजकीय सर्वत्र चर्चा होत आहे.
खरंतर, विरोधी पक्षांनी जर निवडणूक जिंकली तर पंतप्रधान कोण होईल? हा प्रश्न अद्याही अनुरुत्तरीतच आहे. आतापर्यंत या प्रश्नाच्या उत्तरा दाखल कोणत्याही एका पक्षाच्या नेत्याचं नाव घेतलं गेलेलं नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपही यावरून सातत्याने विरोधकांच्या या आघाडीवर निशाणा साधत आहे. तर माध्यम प्रतिनिधीही वेळोवेळी या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा पाठपुरावा करताना दिसतात. अशाचप्रकारे खर्गे(Mallikarjun Kharge) यांनाही हा प्रश्न शिमला येथील पत्रकारपरिषदेत विचारला गेला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रश्नावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधान कोण असेल, हा प्रश्न 'कौन बनेगा करोडपती' सारखा आहे. त्यांनी म्हटले की आघाडीचे सरकार बनल्यानंतर विरोधी पक्षाचे सर्व नेते मिळून ठरवतील. त्यांनी म्हटले की वर्ष 2004 आणि वर्ष 2009 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही सोनिया गांधींनी पंतप्रधान बनण्याचा प्रस्ताव नाकारला होता.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी म्हटले की काँग्रेस पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाही, त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस(Congress) पक्ष त्यांच्या विचारधारेच्या विरोधात लढाई लढत आहे. खर्गे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये नेत्यांना घाबरवणं आणि धमकवण्याचा प्रयत्न होतो. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाला पाठीमागे लावून सरकार पाडण्याचे प्रयत्न होतात. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने सरकार पाडले आणि हिमाचलमध्येही हाच प्रयत्न झाला.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, 4 जून रोजी देशात सरकार बदलणार आहे. इंडिया आघाडी 4 जून रोजी सरकार स्थापन करेल. त्यांनी हेही म्हटले की, जनता मोदी सरकारला वैतागली आहे. बेरोजगारी आणि महागाई सातत्याने वाढत आहे. मोदी(PM Modi) सरकार घटनात्मक संस्थांचा दुरुपयोग करत आहे. ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप अशी आहे. लोक ही निवडणूक सरकारविरोधात लढत आहते. जनता हुशारीने आणि धैर्याने पुढे जात आहे आणि पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.