Shobha Bacchav
Shobha BacchavSarkarnama

Latest Nashik News : मल्लिकार्जुन खर्गे, पवार आणणार बच्छाव यांच्या प्रचारात रंगत!

Shobha Bacchav latest Update on Loksabha Election 2024 : बच्छाव यांनी मतदारसंघातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. धुळे शहरासह ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि नेते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

Dr Shobha Bachhav News: धुळे लोकसभा मतदारसंघात उन्हाचा तडाखा वाढत आहे. या वातावरणात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार करीत वातावरण तापवले आहे. यात काँग्रेसच्या डॉ बच्छाव यांच्या मदतीला आघाडीचे वरिष्ठ नेते धावून येणार आहेत.

धुळे मतदार संघात महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव (Shobha Bacchav) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. डॉ बच्छाव यांच्या नावाची घोषणा झाल्यावर पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना विरोध केला होता. धुळे आणि नाशिकच्या Nashik Loksabha Constituency जिल्हा अध्यक्षांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात बच्छाव यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता मात्र बच्छाव यांनी मतदारसंघातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. धुळे शहरासह ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि नेते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. विशेषत: मालेगाव शहरातील मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी काँग्रेसने (Congress) जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या आठवड्याभरात मतदार संघात नाराज नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन ही नाराजी दूर करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. धुळ्याचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर त्यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.

Shobha Bacchav
Nashik constituency 2024: 'वंचित'चे करण गायकर यांनी रॅली काढली, पण अर्ज भरलाच नाही, कारण...

धुळे मतदार संघातील प्रचारासाठी येत्या 12 एप्रिलला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) दोंडाईचा येथे सभा घेणार आहेत. या सभेमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराला चालना मिळेल. या सभेसाठी प्रारंभी नाराज असलेल्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी पुढाकार घेतला आहे. सभेचे सर्व नियोजन ते करीत आहेत. त्यामुळे खर्गे यांचा सभेनंतर मतदार संघातील वातावरण अधिक अनुकूल होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) येत्या 16 एप्रिलला सटाणा येथे काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि मालेगाव या भागात शेतकरी, पाणी आणि कांद्याचा प्रश्न अतिशय तीव्र आहे. त्यामुळे पवार यांच्या या सभेने भारतीय जनता पक्षाचे अडचण होऊ शकते.

Shobha Bacchav
Nashik Constituency 2024 : मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, 'हा' मोठा नेता सोडणार पक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com