New Parliament Building : जुन्या संसद इमारतीला निरोप देताना खर्गे झाले भावुक; म्हणाले...

New Parliament Building : "पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात नेहरूजींच्या भाषणाचा उल्लेख केला होता.."
New Parliament Building :
New Parliament Building : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या कामकाजात संसद भवनाच्या जुन्या इमारतीबाबत लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली. आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार पायी चालत संसद भवनाच्या नवीन इमारतीत दाखल होणारआहेत. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून नवीन इमारतीत कामकाज सुरू होत आहे. दरम्यान, या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Latest Marathi News)

New Parliament Building :
NCP Politics in Kolhapur : ...तर जिल्हा बँकेत काय झाले ते सगळं बाहेर काढू : मुश्रीफांना इशारा कुणाचा ?

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "संसद भवन वास्तूचा प्रत्येक कोपरा आपल्या 75 वर्षांच्या संसदीय लोकशाहीचा साक्षीदार आहे. अशा परिस्थितीत हे सदन सोडताना भावुक होणे स्वाभाविक आहे. संसदेच्या नवीन इमारतीत आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत. परंतु ही इमारत आमच्या आठवणीत राहील. आम्ही संसदीय परंपरा आणि लोकशाही तत्त्वांचे रक्षण करत राहू आणि देशाच्या विकासासाठी काम करू."

"भारतीय लोकशाहीच्या इतिहासावर चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वच ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये एकत्र आलो आहोत. हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहे. हे तेच सेंट्रल हॉल आहे जिथे संविधान समितीच्या बैठका झाल्या. आज आपण डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचे स्मरण करूया," असेही खर्गे म्हणाले.

New Parliament Building :
Nagpur OBC Morcha : फडणवीसांच्या शब्दावर नाही भाजप नेत्यांनाच विश्वास, धडक मोर्चात झाले सहभागी !

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जी. बी. मालवणकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान आठवण्याची वेळ आली आहे. या सेंट्रल हॉलमध्ये पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याच्या दिवशी भाषण दिले होते. काल पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात नेहरूजींच्या भाषणाचा उल्लेख केला होता, यासाठी मी त्यांचा आभारी आहे," असेही खर्गे म्हणाले.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com