Delhi News : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची इंडिया आघाडीच्या संयोजकपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत खर्गे यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी सोमवारी (ता. २८ ऑगस्ट) तसे स्पष्ट संकेत दिले होते. (Mallikarjun Kharge to be convener of India Aghadi)
मुंबईत येत्या ३१ ऑगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत म्हणजे दोन दिवस देशातील विरोध पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. मुंबईत इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असणार आहे. याच बैठकीत मल्लिकार्जून खर्गे यांची इंडिया आघाडीच्या संयोजकपदी निवड होणार आहे. आघाडीतील सर्व पक्षांनी खर्गे यांच्या नावाला संमती दिल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
दरम्यान, मल्लिकार्जून खर्गे यांच्या रुपाने इंडिया आघाडीच्या संयोजकपदावर दलित चेहरा देण्याचा काँग्रेस आणि मित्रपक्षांचा प्रयत्न आहे. बिहाराचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी सोमवारी पाटण्यात बोलताना मी संयोजकपदासाठी इच्छूक नाही. मुंबईत होणाऱ्या बैठकीत दुसऱ्याच व्यक्तीचे नाव जाहीर होणार आहे, असे सांगितले होते.
इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरणही मुंबईत होणाऱ्या बैठकीत केले जाणार आहे. तो कसा असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. नीतिशकुमार यांनी नकार दिल्यानंतर खर्गे यांच्याकडे ती जबाबदारी आली आहे. आता काँग्रेसकडे संयोजकपद गेल्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार हा काँग्रेसचा असणार की घटक पक्षांचा याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते नीतिशकुमार?
मला आता काहीही नको आहे. मला काहीही बनायचे नाही. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत संयोजक दुसऱ्याच व्यक्तीला बनविण्यात येणार आहे. आम्ही लोकांना एकत्र करत आहोत. सर्वांनी एकत्र यावे आणि त्यांना एका व्यासपीठावर आणावे, अशी आमची इच्छा आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी पाटण्यात बोलताना सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.