Mallikarjun Kharge MP Tour : मल्लिकार्जुन खर्गे मध्यप्रदेशात फुंकणार रणशिंग; पंतप्रधानांचाही करणार सामना..

Madhya Pradesh Election : मध्यप्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
Mallikarjun Kharge News
Mallikarjun Kharge NewsSarkarnama

Madhya Pradesh Politics : मध्यप्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मध्यप्रदेशातील 'सागर'मध्ये दुपारी यांची सभा होणार आहे. खर्गे यांचा दौरा म्हणजे मध्यप्रदेशातील काँग्रेसचा निवडणूक शंखनाद मानला जात आहे.

या वर्षाअखेरपर्यंत मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहे. भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी राबविलेल्या योजना जनमानसापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सागरमध्ये वीस दिवसापुर्वीचं सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत काँग्रेससह कमालनाथ यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्या टीकेला खर्गे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mallikarjun Kharge News
Jaydatta Kshirsagar News : माजी मंत्री क्षीरसागरांना भाजपकडून निरोपाची शक्यता ; म्हणूनच `वेट अँड वॉच` चा पावित्रा..

सागर जिल्ह्याच्या सीमा सात जिल्ह्यांना लागून आहेत. त्यापैकी दहा जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी नऊ जागा सध्या भाजपकडे आहेत. तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी या दहा जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात घेऊन खरगे यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खरगे नेमकं सभेत काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे.

दुपारी 1.30 वाजता भोपाळकडे रवाना होतील. बुंदेलखंडमध्ये 22% अनुसूचित जाती मतदार आहेत. मध्यप्रदेशात राष्ट्रीय अध्यक्षांच्या पहिल्या बैठकीसाठी सागर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सागर, छतरपूर, टिकमगढ, निवारी, दमोह आणि पन्ना जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बुंदेलखंडमध्ये 26 विधानसभेच्या जागा आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 15 जिंकल्या होत्या, काँग्रेसला नऊ आणि सपा आणि बसपाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. सागर जिल्ह्यात भाजपने आठपैकी सहा जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com