Mamata Banerjee news : सुवेंदू अधिकारी यांच्या विजयाविरोधात ममतादीदींना पहिला मोठा दिलासा; कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले महत्वपूर्ण आदेश

Suvendu Adhikari, Calcutta High Court : काऊंटिग एजंटला झालेली मारहाण सीसीटीव्हीतून समोर येईल. त्यामुळे आम्ही सीसीटीव्ही, व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमचे जतन करून ठेवण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती.
Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image)
Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

Bhabanipur Election Case : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भवानीपूर मतदारसंघातील निकालावरून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या निकालाला आव्हान देणारी निवडणूक याचिका कलकत्ता हायकोर्टात दाखल केली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

ममता बॅनर्जी यांची ही याचिका हायकोर्टाने दाखल करून घेतली आहे. त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कोटाने मतमोजणी केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आदी निवडणुकीशी संबंधित साहित्य जतन करून ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच सुवेंदू अधिकारी यांना चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

भवानीपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत ममतादीदींचा सुमारे १५ हजार मतांनी पराभव झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी निवडणूक याचिकेवर माहिती देताना सांगितले की, मतमोजणीदरम्यान बाराव्या फेरीपर्यंत सर्वकाही सुरळीतपणे सुरू होते. पण १३ व्या फेरीनंतर पूर्ण चित्रच बदलले.

Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image)
Sudhir Mungantiwar news : मुनगंटीवारांनी भाजपलाच आणलं अडचणीत; थेट मंत्र्यांविरोधात मांडला हक्कभंग, विधानसभेत तावातावाने बोलले...

मतमोजणीदरम्यान दुपारी तीन वाजता सुवेंदू अधिकारी तिथे आले आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होत आहे, इथेही माझाचा विजय झाला पाहिजे, असे म्हणाले. काऊंटिंग एजंट्सला मारहाण झाली, त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये सीआयएसएफनेही भाजपला मदत केली, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

माजी मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अगरवाल यांची मुख्यमंत्र्‍यांच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या कामाबद्दल अनेक तक्रारी आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार ५५ हजार मतदारांची नावे निवडणूक आयोगाने वगळली. निकालानंतर लगेच त्यांना सचिव करण्यात आले. सुब्रता गुप्ता हे विशेष निरीक्षक होते. या निवडणुकीत ममता बॅनर्जी १५ हजारांनी मतांनी पराभूत झाल्या, असे कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले.

Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image)
Modi Government news : दिल्लीत घडामोडींना वेग, मोदी सरकारमधील पहिला राजीनामा; आणखी पाच मंत्र्यांचा पत्ता होणार कट?

निवडणूक प्रक्रियेत अनेक बेकायदेशीर आणि अनियमित गोष्टी घडल्या. सुब्रता गुप्ता यांना मुख्यमंत्र्‍यांचे विशेष सल्लागार करण्यात आले. काऊंटिग एजंटला झालेली मारहाण सीसीटीव्हीतून समोर येईल. त्यामुळे आम्ही सीसीटीव्ही, व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमचे जतन करून ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायाधीशांनी याचिका दाखल करून घेत आयोगाला तसे आदेश दिल्याचे माहिती बॅनर्जी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com