Narendra Modi News : 'देशात दिवसभरात अत्याचाराच्या ९० घटना';... ममता बॅनर्जींनी लिहिले पीएम मोदींना पत्र

Political News : केंद्रीय कायदा करून अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
PM Narendra Modi and Mamata Banerjee
PM Narendra Modi and Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Kolkata News : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात देशातील महिलांविरोधातील वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे.

अशास्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय कायदा आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कायदा करून अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. (Narendra Modi News)

या पत्रात ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) म्हणाल्या की, आदरणीय पंतप्रधान, मला संपूर्ण देशात बलात्काराच्या वाढत्या घटनांकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. यातील अनेक घटनांमध्ये बलात्कारासोबतच खूनही केला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात दररोज सुमारे 90-90 बलात्काराच्या घटना घडत असल्याचे पाहणे भयावह आहे. त्यामुळे समाज आणि राष्ट्राचा आत्मविश्वास आणि विवेक डळमळीत होत आहे. हे थांबवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल, असेही पत्रात म्हटले आहे.

अशास्वरूपाच्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर सर्वंकष पावले उचलण्याची गरज आहे. ज्यामध्ये अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा होऊ शकते. यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेला कठोर केंद्रीय कायदा केला पाहिजे. प्रस्तावित कायद्यात अशा प्रकरणांमध्ये जलद सुनावणीसाठी जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्याचाही विचार केला पाहिजे. जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी, अशा प्रकरणांची सुनावणी 15 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.

PM Narendra Modi and Mamata Banerjee
Beed Assembly Election : बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या हायप्रोफाइल लढती ठरणार लक्षवेधी

भाजपने केली मुख्यमंत्री बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी

देशव्यापी आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे राज्यातील गृह आणि आरोग्य ही दोन्ही खाती आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेली मुदत संपण्यापूर्वीच कोलकाता उच्च न्यायालयाने महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या घटनेने घेरलेल्या ममता बॅनर्जी यांनी 16 ऑगस्टला कोलकात्यात मोर्चाही काढला होता. यामध्ये त्यांनी दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.

PM Narendra Modi and Mamata Banerjee
Ajit Pawar News : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांच्या भडकलेलेल्या आंदोलनामागे नेमके कोण? अजित पवारांना भलतीच शंका; म्हणाले,...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com