Delhi : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरु आहे. या तयारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी बाबरी मशिद संदर्भात नवीन दावा केला आहे. बाबरी मशिद उघडण्याचा निर्णय हा तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा नव्हता. तर, काँग्रेसच्या इतर नेत्यांचा होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
1986 मध्ये बाबरी मशिद उघडण्यात आली. त्यावेळी काँग्रेस पक्षात अरुण नेहरु हे शक्तिशाली नेता होता. त्यांच्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. भाजपनेच अरुण नेहरू यांना काँग्रेसमध्ये 'प्लांट' केले होते, असा आरोप देखील अय्यर यांनी केला आहे. अरुण नेहरु हे या सगळ्यामागे आहेत हे जेव्हा राजीव गांधींना एक वर्षाने कळले तेव्हा अरुण नेहरु थेट भाजपध्ये सामील झाले होते, असा दावा देखील अय्यर यांनी केला आहे.
राजीव गांधी यांचा मृत्यू जर 1991 मध्ये झाला नसता तर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर समाधानकारक तोडगा त्यांनी काढला असता. त्यामुळे बाबरी मशिद पण कायम राहिली असती आणि राम मंदिर देखील बनले असते. राजीव गांधी यांच्याकडे 400 पेक्षा अधिक जागा होत्या. हिंदू-मुस्लीम वाद घडवून आणण्याचे कोणतेच कारण नव्हते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप राजकारण करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी या सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारून ते तुच्छ राजकारणाचा भाग नसल्याचे दाखवून दिले आहे. आपण काँग्रेसी असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.