Manipur: भाजपला दणदणीत विजय मिळून देणारे बीरेन सिंह दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री

मणिपूर येथे ६० सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपला ३२ जागांवर विजय मिळविला आहे.
n biren singh
n biren singhsarkarnama

इफाळ : मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राज्यपाल गणेशन यांच्याकडे आपला राजीनामा सूपूर्त केला आहे. मणिपूर येथे ६० सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपला ३२ जागांवर विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह (n biren singh)यांनी राजीनामा दिल्याची माहिती राज्यपालांनी टि्वट करुन दिली आहे. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहणार आहेत.

मणिपूरच्या जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर काँग्रेसला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय एनपीएफ पाच, एनपीपी सहा, जनता दल (संयुक्त) सहा आणि इतर उमेदवारांचा पाच जागांवर विजय झाला आहे.

2017 च्या निवडणुकीत 28 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. परंतु, भाजपने काँग्रेच्या काही आमदारांमध्ये फूट पाडून त्यांना आपल्यासोबत घेत सत्ता स्थापन केली होती.

n biren singh
maharashtra budget 2022 : भिडे वाड्याच्या जतनासाठी शंभर कोटी

मणिपूरमध्ये 32 जागा जिंकत पुन्हा एकदा भाजपने विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करत बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पत्रकारितेतून राजकारणी झालेले नॉन्गथोम्बम बिरेन सिंग हे राजकारणात प्रवेश केल्यानंतर 20 वर्षात सलग दुसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या पाच वर्षांत दहशतवादग्रस्त मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे तसेच डोंगराळ प्रदेशातील आणि खोऱ्यातील लोकांमधील तेढ दूर करण्याचे श्रेय एन बिरेन सिंग यांना जात आहे. त्यामुळेच मणिपूरच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत भाजपला स्पष्ट भहुमत दिले आहे.

n biren singh
Maharashtra Budget :सीएनजी स्वस्त होणार ; पेट्रोल-डिझेलवरील करात कपात नाही

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नॉन्गथोम्बम बिरेन सिंग यांनी राजधानी इंफाळमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत डान्स करून आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, "मी मणिपूरच्या जनतेचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही मणिपूरमध्ये विजय मिळवू शकलो. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यातील पक्षाचा विजय पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ सबका विकास' या मंत्राचे प्रतिबिंबही देतो."

राजकारणात येण्यापूर्वी एन बीरेन सिंह हे पत्रकार होते. तसेच ते फुटबॅाल खेळाडूही होती. मणिपूर मधील शांतता प्रस्थापित करण्यात बीरेन सिंह यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी २००२ पासून ते राजकारण सक्रीय आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com