Manipur Violence : मोठी बातमी : मणिपूरमध्ये मंत्र्यांनी घरातच बनवले बंकर, आगडोंब उसळण्याची भीती

Manipur Government in trouble Political situation : मणिपूरमधील सध्याची स्थिती विस्फोट बनली असून अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
Manipur Violence
Manipur ViolenceSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मणिपूरमध्ये पुन्हा आगडोंब उसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह नदीत आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शनिवारपासून पुन्हा हिंसा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह आमदारांच्या घरावर हल्ले करण्यात आले आहे. रविवारी सुरक्षा यंत्रणांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता बचावासाठी आपल्याच घरात बंकर उभारल्याची माहिती समोर आली आहे.

मणिपूरमध्ये शनिवारी काही आमदार व मुख्यमंत्र्यांच्या घराव आंदोलकांनी हल्ला केला होता. जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला. तर रविवारी एका जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपच्या कार्यालयातील साहित्य बाहेर काढून जाळण्यात आले. आंदोलकांच्या या पवित्र्यामध्ये सरकारमधील मंत्री घाबरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Manipur Violence
Kailash Gahlot : ED, CBI कडून चौकशी सुरू असलेले माजी मंत्री भाजपमध्ये; राजीनाम्यानंतर 24 तासांत ‘करेक्ट कार्यक्रम’

मणिपूरच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री एल. सुसिंद्रो यांनी घरात बंकर बनवले असून त्यामध्ये सुरक्षेसाठी हत्यारेही ठेवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन, मंत्री सुसिंद्रो यांच्यासह राज्यातील 17 आमदारांना आंदोलकांनी आतापर्यंत लक्ष केले आहे. राज्यात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले असले तरी राजकारण्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचा दावा त्यांच्याकडूनच केला जात आहे.

‘न्यूज 18’ शी बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, सध्याची राज्यातील स्थिती चांगली नाही. माझे सचिव रुग्णालयात उपचार घेत आहेत. बीएसएफचे जवान माझ्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत. त्यांच्यावरही हल्ल झाला आहे. आम्हाला आमचीच सुरक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मी घरातच बंकर उभारले आहे. आम्हाला शांतता हवी आहे पण हल्ला झाल्यास प्रत्युत्तर द्यावे लागेल.

Manipur Violence
Rahul Gandhi : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत फोडला तिजोरी बॉम्ब; दोन फोटो दाखवत मोदींवर हल्लाबोल

केंद्र सरकार सतर्क

राज्यातील बिघडलेली स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यात अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. अधिकचे 5 हजार जवान पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच मणिपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून काही भागातील पदाधिकारी सामुहिक राजीनामे देत असल्याचे समोर आले आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com