Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं ; एकमेव महिला मंत्र्याच्या घराला आग..

Minister Nemcha Kipgens House Set on Fire : शंभरहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. पाचशे पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
Manipur Violence news
Manipur Violence news Sarkarnama
Published on
Updated on

Manipur Unrest : मणिपूर पुन्हा पेटले असून पश्चिम इंफाळ जिल्ह्यात लाम्फेल परिसरात मणिपुरच्या एकमेव महिला मंत्री नेमचा किपगेन यांच्या घराला समाजकंटकांनी आग लावली. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. लष्काराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

नेमचा किपगेन यांच्या घराला आग लावली त्यावेळी त्यांच्या घरी कुणी नसल्याने अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल व प्रशासन यंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे. या घटनेची जबाबदारी अद्याप कुठल्याही घटकाने घेतलेली नाही. किपगेन या कुकी समाजाच्या नेत्या आहेत.

Manipur Violence news
Lok Sabha Elections News : या मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक ; दोनवेळा राज्यसभेवर..

महिनाभरापासून मणिपुरात मेइती आमि कुकी समाजातील काही जणांमध्ये झालेल्या वादामुळे हिंसाचार झाला. यात अद्यापपर्यंच शंभरहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. पाचशे पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

मंगळवारी रात्री कंग्पोक्पी जिल्ह्यातील खमेन्लोकमध्ये बिगर आदिवासी आणि आदिवासी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ११ लोकांचा मृत्यू झाला. तर ४-५ लोक बेपत्ता आहेत. ९ मृतदेहांची ओळख पटली आहे. १० लोक जखमी झाले आहेत.

Manipur Violence news
Stalin Government : मोठा निर्णय ; CBI ला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार !

राज्यात मोबाइल इंटरनेट बंदी कायम आहे. १६ पैकी ११ जिल्ह्यांत अजूनही संचारबंदी आहे. सुग्नू भागात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. समाजकंटकांनी प्रमुख रस्ते बंद केले आहेत. यामुळे रसद-औषध पोहोचवताना अडचणी येत आहेत. गॅसचे सिलिंडर अडीच हजारांत मिळत आहे. लष्कराने बुधवारी हेलिकॉप्टरद्वारे जीवनावश्यक साहित्य पुरवले.

अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, अशी मागणी मेहती समाजाची आहे. त्याला विरोध करण्यासाठी ३ मे राजी 'आदिवासी एकजूटता मार्च'चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हिंसाचार झाला.

मणिपूर येथे ५३ टक्के लोकसंख्या ही मेहती समाजाची आहे. ते प्रामुख्यांने इफाळ घाटी परिसरात राहतात. आदिवासी नगा आणि कुकी यांची लोकसंख्या ४० टक्के आहे. ते पर्वतीय जिल्ह्यात राहतात.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com