कॉग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून बड्या नेत्याचे नाव गायब

कॉग्रेस नेतृत्वावर नाराज असलेल्या जी २३ नेत्यांमधील मनीष तिवारी हे एक नेते आहेत. सोनिया गांधी यांना जी २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात मनीष तिवारी यांची स्वाक्षरी होती.
manish tewari
manish tewarisarkarnama

चंडीगढ़ : पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी विधानसभेची निवडणूक (Punjab Assembly Election) होत आहे. या निवडणुकीसाठी कॅाग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात सोनिया गांधी (Sonia Gandhi), मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, हरीश चैाधरी, नवज्योत सिंह सिद्धु, चऱणजीत सिंह, अंबिका सोना, मीरा कुमार, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा, अजय माकन, भूपेंद्र सिंह हुड्डा, आनंद शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. पण एका ज्येष्ठ नेत्यांला या यादीतून वगळण्यात आले आहे. रविवारी (ता.६) राहुल गांधी पंजाब दैाऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी हा वाद सुरु झाला आहे.

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (manish tewari) हे कॉग्रेसचे एक प्रमुख नेते आहेत. कॉग्रेसने त्यांना पंजाब निवडणुकीपासून लांब ठेवलं आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतून तिवारी यांना वगळलं आहे. कॉग्रेस नेतृत्वावर नाराज असलेल्या जी २३ नेत्यांमधील मनीष तिवारी हे एक नेते आहेत. सोनिया गांधी यांना जी २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात मनीष तिवारी यांची स्वाक्षरी होती.

manish tewari
आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान ; म्हणाले, 'लढाई आता सुरु'

पंजाबमध्ये मतदारांमध्ये ४० टक्के हिंदू मतदार आहेत, तर उत्तरप्रदेश आणि बिहारमधील रहिवाशी असलेल्या मतदारांची संख्याही पंजाबमध्ये मोठी आहे. या सर्वांना आकर्षित करण्यासाठी निवडणुक प्रचारात पंजाबमध्ये तिवारी यांना उतरविण्याचा कॉग्रेससमोर चांगला पर्याय होता. आनंदपुर साहिब हा मतदार संघ शिख बहुल मतदार संघ आहे. येथून २०१४ मध्ये कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये मनीष तिवारी यांनी ही जागा जिंकली होती.

manish tewari
भाजपनं आशिष शेलारांना दिली मोठी जबाबदारी

तिवारी यांना प्रचारातून बाहेर ठेवल्यामुळे त्यांचे पंजाबमधील समर्थक कॉग्रेसवर नाराज आहेत. ''तिवारी हे राज्यसभेतून लोकसभेत निवडणूक गेलेले एकमेव हिंदू नेता आहेत. तिवारी यांना डावलून कॉग्रेस कार्यकर्त्यांना काय संदेश देत आहे,'' असे तिवारी यांच्या समर्थकांचे मत आहे. याबाबत तिवारी यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, ''मला निवडणूक प्रचारातून का डावलण्यात आले हे तुम्ही ज्यांनी ही यादी केली त्यांना हा प्रश्न विचारा,''

कॉग्रेसने जाहीर केलेल्या या यादीत शिख नसलेले आनंद शर्मा, अंबिका सोनी, सुनील जाखड़, भूपिंदर सिंह हुड्डा, अशोक गहलोत, रणदीप सिंह सुरजेवाला, राजीव शुक्ला, सचिन पायलट आणि कुमारी शैलजा आदी नेत्यांची नावे आहेत. तिवारी यांचे नाव जाणीवपूर्वक या यादीतून वगळलं आहे, असा आरोप तिवारींच्या समर्थकांनी केला आहे. तिवारी हे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे त्याचे नाव स्टार प्रचारकामधून डावलण्यात आल्याचे हे एक कारण असू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com