ashish shelar
ashish shelarsarkarnama

भाजपनं आशिष शेलारांना दिली मोठी जबाबदारी

भाजपने पक्ष संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. भाजपनं या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक समिती यादी जाहीर केली आहे.
Published on

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिकेतील शिवसेनेचे सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजपने पक्ष संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. भाजपनं या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक समिती यादी जाहीर केली आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याशी चर्चेनंतर निवडणुकीच्या दृष्टीने २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केल्या. निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार अँड. आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ashish shelar
नितेश राणेंच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर

जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.निवडणूक संचालन समितीत खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या हे निमंत्रक असून आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर,नितेश राणे, प्रकाश मेहता हे सदस्य असतील.

ashish shelar
दलितांवर पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ सरकारनं आणली ; भाजपचा आरोप

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रशासन समन्वयपदी नेमणूक करण्यात आली आहे. आचार्य पवन त्रिपाठी आणि आमदास विद्या ठाकूर यांच्याकडे विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला संपर्क समितीची जबाबदारी शलाका साळवी, शीतल गंभीर यांच्याकडे आहे. संजय पांडे यांच्याकडे प्रवाशी कार्यकर्ता समितीची जबाबदारी आहे.

भाजप आमदार योगेश सागर हे जाहिरनामा समितीचे सचिव असतील. या समितीत भाजप नेते सुनिल राणे, आर.यू. सिंह, राजहंस सिंह, प्रभाकर शिंदे हे सदस्य आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com