
Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी काल दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. तर देशासह परदेशातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मात्र, उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) समाजकल्याण राज्यमंत्री असीम अरुण यांनी सोशल मीडियावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दलची एक भावूक आठवण शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहे. शिवाय त्यांच्या या पोस्टमधून मनमोहन सिंग यांचा नम्र आणि सर्वसामान्यांशी जवळीक साधणारा स्वभाव दाखवून दिला आहे.
त्यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणून काम करतानाही मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी लक्झरी BMW कारपेक्षा मारुती 800 ला प्राधान्य दिल्याचा किस्सा सांगितला आहे. गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर लगेचच असीम अरूण यांनी ही पोस्ट शेअर केली.
असीम अरूण यांनी विशेष संरक्षण गट (SPG) अधिकारी म्हणून जवळपास 3 वर्षे सिंग यांच्या जवळचे सुरक्षा अधिकारी म्हणून काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या साध्या जीवनशैलीबद्दलचा अनुभव शेअर केला आहे.
पंतप्रधानांसाठी SPG च्या क्लोज प्रोटेक्शन टीम (CPT) चे प्रमुख असतानाची एक आठवण सांगताना त्यांनी असीम अरूण यांनी लिहिलं, "एआयजी सीपीटी या नात्याने माझी जबाबदारी होती की पंतप्रधानांसोबत त्यांच्या सावलीप्रमाणे कायम रहायचं. त्यांच्यासोबत जर कोणी एकच अंगरक्षक ठेवण्याची परवानगी असेल तर तो मी होतो.
डॉक्टर साहेबांकडे फक्त एकच कार होती, ती म्हणजे मारुती 800, जी पंतप्रधानांच्या निवसस्थानात असणाऱ्या लक्झरी काळ्या BMW च्या मागे उभी असायची. मनमोहन सिंगजी मला सतत म्हणायचे, असीम, मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही, माझी कार ही (मारुती) आहे.
मी समजावून सांगायचो की सर, ही कार तुमच्या लक्झरीसाठी नाही, तर तिची सुरक्षा वैशिष्ट्ये खास आहेत म्हणून एसपीजीने ती घेतली आहे. पण जेव्हा जेव्हा मारुती 800 समोरून त्यांचा ताफा जायचा तेव्हा ते त्याकडे बघत रहायचे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.