Manoj Jarange Delhi Visit: मुंबईनंतर मनोज जरांगे आता थेट दिल्लीत धडकणार! केली मोठी घोषणा

Manoj Jarange Delhi Visit: धाराशिव इथं हैदराबाद गॅझेटियर संदर्भात पार पडलेल्या एका बैठकीत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली.
Manoj Jarange
Manoj Jarange
Published on
Updated on

Manoj Jarange Delhi Visit: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे हे आता थेट दिल्लीत धडक देणार आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी घोषणा केली असून त्यासाठी तयारीही सुरु केली आहे.

Manoj Jarange
Kolhapur BJP: इचलकरंजीत भाजपच्या गुप्त बैठकीत नेमके घडले काय? वरिष्ठांनी खडसावताच नेत्यांची भूमिका मवाळ

मराठा समाजाचं अधिवेशन

देशभरात विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी दिल्लीत मराठा समाजाचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन पार पडणार आहे. त्याअनुषंगानं लवकरच या अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. धाराशिव इथं हैदराबाद गॅझेटियर संदर्भात पार पडलेल्या एका बैठकीत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली.

Manoj Jarange
Prakash Ambedkar: अमेरिकेच्या टॅरिफमुळं लवकरच भारतात नेपाळसारखी स्थिती? प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

धाराशीवमध्ये घोषणा

धाराशिवमध्ये जरांगेंनी आज सकल मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आता चलो दिल्ली असा नारा दिला. हा दिल्लीचा दौरा म्हणजे कुठलंही आंदोलन किंवा मोर्चा नसेल. तसंच कुठल्याही मागणीसाठी हा दिल्लीचा दौरा नसेल. तर केवळ देशभरातील मराठा बांधवांना एकत्र करण्यासाठी हा दौरा असणार आहे. या अनुषंगानं दिल्लीत तयारी देखील सुरु केली आहे. पण अद्याप या अधिवेशनाची तारीख जाहीर झालेली नाही, ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Manoj Jarange
Prakash Ambedkar: अमेरिकेच्या टॅरिफमुळं लवकरच भारतात नेपाळसारखी स्थिती? प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

जरांगे नेमकं काय म्हणाले?

बैठकीनंतर जरांगे म्हणाले, "आपल्या राजानं अटकपासून कटकपर्यंत थेट अफगाणिस्तानपर्यंत झेंडे फडकावले आहेत. कुठं कुठं आपल्या राजाचे पाय लागले त्या भूमिका आपण नतमस्तक झालो पाहिजे राव. म्हणून एक दिवस आपल्या भावंडांसाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला. त्यासाठी आम्ही मोठं अधिवेशन दिल्लीत घेत आहोत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com