
Chhattisgarh Maoists attack News : पोलिसांनी बुधवारी सांगितले की छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी मंगळवारी रात्री पोलिसांची खबरी असल्याच्या आरोपातून स्थानिक भाजप नेत्याची कथितरित्या हत्या केली.
बीजापूर पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना जिल्ह्यातील फरसेगढ पोलिस स्टेशन क्षेत्रांतर्गत सोमनापल्ली गावात झाली. माजी मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते महेश गागडा यांनी म्हटले की, या घटनेसोबतच या वर्षी आतापर्यंत बस्तर विभागात विविध ठिकाणी माओवाद्यांच्या हिंसाचारात 60 पेक्षा अधिकजण मारले गेले आहेत. पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, माओवाद्यांनी 35 वर्षीय कुडियाम माडो यांना त्यांच्या घरातून खेचून बाहेर आणले आणि गळा घोटून त्याची हत्या केली. माडो भारतीय जनता किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते.
पोलिसांनी(Police) म्हटले की, त्यांनी प्रतिबंधित सीपीआय(माओवादी)चे बीजापूर राष्ट्रीय उद्यान क्षेत्र समितीद्वारे जारी एक पत्रकही जप्त केले. ज्यामध्ये माओवाद्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला आणि त्यामुळे त्यांची हत्या केली. स्थानिक फरसेगढ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
रमन सिंह मंत्रिमंडळातील माजी मंत्री वरिष्ठ भाजप(BJP) नेते महेश गागडा यांनी दुजोरा दिला केली, मृत व्यक्ति जिल्हा भाजपचे नेते होते. गागडा यांनी म्हटले की, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. कारण, बस्तरमध्ये मारले गेलेले बहुतांश भाजप नेते बीजापूरचे आहेत.
या घटनेबरोबरच यावर्षी आतापर्यंत बस्तर विभागात विविध ठिकाणी माओवादी हिंसाचारात ६० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान प्रभागात वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ भाजप नेत्यांची हत्या केली गेली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.