
Asaduddin owaisi News : भाजपचे फायर ब्रॅण्ड नेते व केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन(एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. वेळोवेळी त्यांच्या एकमेकांविरोधातील विधानांमधून याचा सर्वांनाच प्रत्यत्त आलेला आहे. मात्र ओवैसींनी गिरिराज सिंह यांची भेट घेण्यासाठी थेट त्यांचे दिल्लीतील कार्यालय गाठल्याने, आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे ही भेट अतिशय खेळीमेळीची झाली आणि यााबबत ओवैसींनी स्वत: माहिती दिली आहे.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन(AIMIM)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांची दिल्लीत त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. या दरम्यान त्यांच्यासोबबत महाराष्ट्रातील मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माइल कासमी आणि एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते.
या भेटीबाबत माहिती देताना असदुद्दीन ओवैसींनी(Asaduddin owaisi) सोशल मीडियावर सांगितले की, दहा सदस्यीय प्रतिनिधिमंडळाने वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना मालेगाव पॉवरलूम उद्योगाच्या समस्यांबाबत माहिती दिली, ज्यामध्ये 5 लाख यूनिट समाविष्ट आहे. प्रतिनिधिमंडळाने केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांना मालेगाव दौरा करण्याचीही विनंती केली.
त्यांनी पुढे म्हटले की, प्रतिनिधिमंडळात मालेगावचे आमदार इस्माइल कासमी, एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि मोमिन मुजीब अहमद सहभागी होते. यावर गिरिराज सिंह(giriraj singh) यांनी आश्वासन दिले की, ते समस्यांवर गांभीर्याने विचार करतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माइल कासमी हे विजयी झाले होते. त्यांना 109,653 मतं मिळाली होती. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या इंडियन सेक्युलर असेंबलीच्या आसिफ शेख रशीद यांचा पराभव केला. त्यांना 109,491 मतं मिळाली होती आणि समाजवादी पार्टीचे शान ए निहाल अहमद यांचाही पराभव केला, ज्यांना केवळ 9,624 मतं मिळाली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.