Maryam Nawaz News : नवाझ शरीफांच्या मुलीने घडवला इतिहास; पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या...

Pakistan News : पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या नेत्या मरियम यांना तब्बल 220 मते मिळाली, तर विरोधी उमेदवाराला एकही मत मिळालं नाही.
Maryam Nawaz
Maryam NawazSarkarnama

Punjab CM News : पाकिस्तानमध्ये आज मरियम नवाझ यांनी इतिहास घडवला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर मरियम विराजमान झाल्या असून, त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. निवडणुकीत त्यांना 220 मते मिळाली, तर विरोधी उमेदवाराला एकही मत मिळाले नाही. मरियम या माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत. (Maryam Nawaz News) 

मरियम यांच्याविरोधात सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे (SEC) राणा आफताब अहमद यांनी निवडणूक (Election) अर्ज भरला होता. मात्र, या निवडणुकीवर एसआयसीने बहिष्कार टाकल्याने मरियम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. मरियम यांनी 220 मतं मिळवत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

Maryam Nawaz
Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्र्यांची खासदार पत्नी काँग्रेसला देणार धक्का; एकमेव जागाही जाणार

पंजाब विधानसभेत (Punjab Assembly) आज मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक झाली. विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच एसआयसीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निवडणुकीची घोषणा करत इतर सदस्यांना भाषण करण्यास मज्जाव केला. पीएमएल-एन पक्षाकडे बहुमत असल्याने मरियम यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यानुसार निवडणुकीत त्यांचा विजय झाला. (Pakistan latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्रिपदाच्या निवडणुकीआधी मरियम यांच्या पक्षाला विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाला होता. अध्यक्षांना 224, तर उपाध्यक्षांना 220 मते मिळाली होती. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल, असे सांगितले. त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइनचीही घोषणा केली.

2012 मध्ये राजकारणात प्रवेश

मरियम यांचा विवाह 1992 मध्ये पाकिस्तान आर्मीतील कॅप्टन सफदर अवान यांच्याशी झाला. त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये त्या सक्रिय राजकारणात आल्या. त्यांच्याकडे लगेच 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पंतप्रधानांच्या युवा कार्यक्रमाच्या त्या अध्यक्षा होत्या. 2024 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी निवडणुकीत नशीब आजमावले आणि विजयीही झाल्या.

R  

Maryam Nawaz
Arvind Kejriwal News : कबुलीनंतर केजरीवालांच्या ‘त्या’ चुकीला माफी? सुप्रीम कोर्टाकडून दिलासा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com