या दोन महिलांच्या बाणांनी इम्रान खान घायाळ; राजकीय संकटात दोघींचा दबदबा

पाकिस्तानातील राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. संसदेने पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला असून राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली आहे.
Maryam Nawaz Sharif, Reham Khan
Maryam Nawaz Sharif, Reham KhanSarkarnama

इस्लामाबाद : पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. संसदेने पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला असून राष्ट्रपतींनी संसद (Parliament) बरखास्त केली आहे. त्यावरून पाकिस्तानात राजकीय अराजक निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटना-घडामोडींमध्ये मात्र पाकिस्तानातील दोन महिला चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी इम्रान खान यांना जेरीस आणले असून टीकेचे बाण रक्तबंबाळ करत आहेत.

मरियम नवाज शरीफ (Maryam Nawaz sharif) आणि रेहम खान (Reham Khan) या त्या दोन महिला आहे. मरियम या माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांची मुलगी असून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात सक्रीय आहेत. तर रेहम खान या इम्रान खान यांच्या पत्नी होत्या. दोघांचा घटस्फोट झाला असून त्या सातत्याने इम्रान यांना लक्ष्य करत आहेत. या दोघाही सध्या विविध माध्यमातून इम्रान खान यांच्यावर टीकेचे बाण सोडत आहेत. (Imran Khan News Update)

Maryam Nawaz Sharif, Reham Khan
विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाण्याआधीच राष्ट्रपतींची पंतप्रधानांच्या शिफारशीवर मोहोर

माफियांचा संविधानावर हल्ला

पाकिस्तान 2018 नंतर पाकिस्तानच्या राजकारण मरियम यांचा दबदबा चांगलाच वाढला आहे. शहबाज शरीफ हे विरोधी पक्षांचा चेहरा असले तरी मरियम यांनीच इम्रान खान यांना या स्थितीत आणल्याची चर्चा आहे. त्या सतत सभा व विविध माध्यमातून इम्रान यांना घेरत आल्या आहेत. सध्या त्या मुस्लिम लीग-एन या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. नवाज शरीफ हे राजकारणापासून दूर गेल्यानंतर त्यांच्याच खांद्यावर पक्षाची जबाबदारी आहे.

संसद बरखास्त केल्यानंतरही मरियम या इम्रान यांच्यावर बरसल्या आहेत. इम्रान खान यांनी आज आत्महत्या केली आहे. त्यांची नौटंकी आणि गोष्ट आता संपली आहे, असं टीकास्त्र मरियम यांनी सोडलं आहे. तसेच इम्रान व त्यांच्या सहकाऱ्यांचा फोटो ट्विट करत त्यांनी हे चेहरे लक्षात ठेवा असं म्हटलं आहे. या माफियांच्या गटाने पाकिस्तानच्या संविधानावर हल्ला केला आहे. त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करायला हवी, असंही त्या म्हणाल्या आहेत.

अक्कल नसलेली व्यक्ती, घुसखोर!

इम्रान खान यांच्या खासगी आयुष्यातील अनेक वादग्रस्त घटना जनतेसमोर आणत रेहम खान यांनी त्यांना अनेकदा अडचणीत टाकलं आहे. त्या सतत इम्रान यांच्याविरोधात बोलत असतात. अनेक गंभीर आरोप करत रेहम यांनी इम्रान खान यांना जेरीस आणले आहे. राजकीय संकटावर बोलतानाही त्या म्हणाल्या की, इम्रान खान यांच्याकडं सगळं आहे, पण अक्कल नाही. ते पंतप्रधान नव्हते तेव्हा पाकिस्तान महान होता, असं त्या म्हणाल्या होता. दोघांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला आहे.

रेहम यांनी एका ट्विटमध्ये इम्रान यांचा 'मिनी ट्रम्प' असा उल्लेख करून टोला लगावला आहे. आजच्या कृतीवर इम्रान यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संविधानाचे उल्लंघन केले असून ते दोषी आहेत. त्यांनी पंतप्रधानपदासाठी घुसखोरी केली होती, हे सिध्द झाले आहे. त्यामुळे सत्तेत राहण्याचे कोणतेही नैतिक किंवा कायदेशीर औचित्य नाही. निवडून आलेल्या या घुसखोराला बाहेर काढा आणि त्याच्यावर कलम 6 नुसार संविधानविरोधी देशद्रोहाची कारवाई करा, अशी मागणी रेहम यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com