विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाण्याआधीच राष्ट्रपतींची पंतप्रधानांच्या शिफारशीवर मोहोर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना थेट संसदचं बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केलं आहे.
Pakistan Assembly
Pakistan AssemblySarkarnama
Published on
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलेली संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात मध्यावधी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण आता विरोधकही आक्रमक झाले असून त्यांनी संसदेतच ठिय्या मारला आहे. अविश्वास ठराव फेटाळण्याच्या संसदेच्या निर्णयावर विरोधकांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण त्याआधीच राष्ट्रपतींनी संसदच बरखास्त केल्यानं पाकिस्तानात राजकीय संघर्ष चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इम्रान खान यांच्यावरील अविश्वास ठराव रविवारी संसदेनं (Parliament) फेटाळून लावला. हा ठराव घटनाबाह्य असल्याचे सांगत संसदेच्या उपसभापतींनी ठराव फेटाळून लावला. पण त्याआधीच संसदेत येण्याऐवजी इम्रान खान हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेल होते. यावेळी त्यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ही शिफारस मान्य करत संसद बरखास्त केली. त्यामुळे आता पाकिस्तानात (Pakistan) मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे.

Pakistan Assembly
इम्रान खान यांचा यॉर्कर; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतींना भेटत केली मोठी घोषणा

संसदेत अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याविरोधात याचिका केल्याचे समजते. न्यायालयाने त्यासाठी स्वतंत्र खंडपीठाची नेमणूक केली आहे. तसेच सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी सरन्यायाधीशांनी न्यायाधीशांची बैठक बोलावून चर्चा सुरू केली आहे. पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी सांगितलं की, सरकारने संविधानाचे उल्लंघन केले आहे. अविश्वास प्रस्तावावर आम्हाला मतदान करू दिले नाही. आता आम्हीही संसद सोडणार नाही. आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असं झरदारी यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले इम्रान खान?

संसदेत विश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर इम्रान यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोण खरं कोण खोटं याचा निर्णय आता जनतेनं घ्यावा, मी राष्ट्रपतींची भेट घेऊन संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. माझ्या विरोधात परदेशातून षडयंत्र रचण्यात आलं. त्यासाठी अनेकांनी पैसे घेतले. त्यामुळे आता याचा निर्णय जनताच घेईल. जनतेसमोरच याचा निर्णय होईल, असं इम्रान खान यांनी स्पष्ट केलं. जनतेने आता सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार राहावं, असं आवाहनही इम्रान यांनी जनतेला केलं. (Imran Khan News Update)

Pakistan Assembly
'अच्छे दिन'चं वारं पाकिस्तानातही; माजी पंतप्रधानांच्या मुलीचे सुचक संकेत

दरम्यान, आज संसदेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार होते. त्यांची सत्ता जाणार, अशीच चर्चा सर्वत्र होती. विरोधकांनी जोरदार तयारीही केली होती. पण प्रत्यक्षात या ठरावावर कामकाज सुरू झाल्यानंतर संसदेच्या उपसभापतींनी हा ठराव घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावला आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत (Parliament) अविश्वास ठराव मांडला होता. पण परीक्षेला सामोरे जाण्याआधीच संसदेने हा ठराव फेटाळला आहे. परकीय शक्तींचा वापर करून पाकिस्तानमध्ये राजकीय अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात येत असल्याचे उपसभापतींनी स्पष्ट केलं.

Pakistan Assembly
इम्रान खान बचावले; संसदेच्या उपसभापतींनी विरोधकांचा डाव उलटवला

दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी इम्रान खान यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, मला वाटते की, इम्रान खान यांना ते अटक करू शकतात. ते इम्रान खान यांना सहन करू शकत नाहीत. जवळपास 155 खासदार राजीनामा देऊ शकात. हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे. या स्थितीत निवडणुकीच एकमात्र पर्याय आहे. पाकिस्तानी यंत्रणांनी याची दखल घेत निवडणुकांची तयारी करायला हवी, असंही शेख रशीद यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मध्यावधी निवडणुका होणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

पीएमएलएन पक्षाच्या नेत्या मरियम औरंगजेब यांनी विरोधकांना 174 खासदारांचे समर्थन असल्याचा दावा केला होता. मतदानाआधी विरोधकांच्या बैठकीत 177 खासदारांनी हजेरी लावल्याचा दावाही केला जात होता. त्यामुळे इम्रान खान यांची सत्ता जाऊ शकते, असा अंदाज होता. सत्ता मिळवण्यासाठी त्यांना 172 चा आकडा गाठवा लागणार होता. त्यामुळे इम्रान खान दमछाक होणार असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यासाठी इम्रान खान यांनी सत्ता टिकवण्यासाठी घोडेबाजार सुरू केला होता. पण अखेर यांनी सर्वांनाच चकित करत संसद बरखास्त करण्याची शिफारस केल्यानं विरोधकांनाही धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com