Mumbai :मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीने कंबर कसली आहे, 26 पक्ष एकत्र येत मोदींच्या विरोधात मोट बांधत असताना बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मायावती या भाजपसोबत असल्याचा सूतोवाच केला आहे. मायावतींचा भाजपशी सुसंवाद सुरू असल्याचे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
"मायावती या इंडिया आघाडीत सामील होतील," अशी शक्यता व्यक्त केली जात असताना मायावतींना आज (बुधवारी) टि्वट केले आहे. "एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये हे जातीवादी पक्ष आहेत. त्यांच्या धोरणाबाबत बीएसपी संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही विधानसभा आणि लोकसभा स्वतंत्रपणे लढणार आहोत," असे मायावती म्हणाले.
"विरोधकांच्या फोडाफोडीच्या राजकारणापासून अलिप्त असलेली बीएसपी समाजातील उपेक्षीत समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. बीएसपी ही लढाई २००७च्या निवडणुकीसारखीच असेल. त्यामुळे माध्यमांनी अफवावर विश्वास ठेवू नये," असे मायावती म्हणाल्या.
विरोधी नेत्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीत जागावाटपासून निवडणूक अजेंड्यावर चर्चा होऊन दिशा ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, या बैठकीत जागावाटपाचे सूत्रच नव्हे तर थेट जागा पदरात पाडून घेण्याची चढाओढ होण्याचे संकेत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या सहकाऱ्यांना शहाणपणाचा 'सल्ला' दिला आहे.
बैठकीआधीच 'इंडिया'च्या नेत्यांत कुरबुऱ्या होऊ शकतात. हे जाणून "आता जागावाटपाची घाई कशाला हवी," असा सवाल करीत, अब्दुल्ला यांनी जागावाटपाची चर्चा करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.