Amravati : भाजपमध्ये प्रवेश करुन खासदार नवनीत राणांनी अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, अशी विनंती भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, नवनीत राणांनी याबाबत अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. नवनीत राणांना पाठींबा द्यायचा की भाजपचा उमेदवार उभा करायचा, अशा विचारात भाजप असताना आमदार रवी राणा यांनी सावध भूमिका घेतली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार नवनीत राणा यांना भाजपच्या कमळावर निवडणूक लढण्याची विनंती नुकतीच केली. बावनकुळेंच्या विनंतीचा मान ठेवून "देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवनीत राणा यांना आशीर्वाद देतील," असे आमदार रवी राणा म्हणाले.
रवी राणा म्हणाले, "चंद्रशेखर बावनकुळेंना मी धन्यवाद देतो. बावनकुळेंना वाटतं की नवनीत राणा यांनी भाजपवर लढावं. आम्ही राज्यात देवेंद्र फडणवीस व केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. भाजपप्रणीत एनडीएमध्ये आम्ही सुद्धा घटक आहोत. आम्ही एनडीएचे घटक असल्याचे फडणवीस, मोदी नवनीत राणांना पाठींबा देतील," आम्ही आघाडी धर्माचे पालन केले भाजपही आघाडी धर्माचं पालन करेल," असे सूचक विधान त्यांनी केले. "आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१९९१च्या निवडणुकीपासून युतीच्या काळात भाजपला अमरावती लोकसभा मतदार संघाच उमेदवारी मिळालेली नाही. या मतदार संघावर शिवसेनेचेच वर्चस्व आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून नवनीत राणा रिंगणात होत्या. त्यांनी मोदी लाटेतही शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. निकालानंतर नवनीत राणा यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठींबा दिला.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.