Kolhapur News: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षीय पातळीवरील महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी असली तरी भाजपने आतापासूनच स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू ठेवली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भोपळाही फोडता न आल्याने अनेकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या संदर्भाची यादी राज्यसभेची खासदार धनंजय महाडिक यांनी दाखवल्याचा दावा करत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दंड थोपटले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जण भाजपमध्ये येण्यात उत्सुक आहेत. त्याची यादी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मला दाखवली आहे. या यादीमध्ये अन्य पक्षांचे कार्यकर्ते,पदाधिकारी, नेते भाजपमध्ये येण्यात तयार आहेत. लवकरच त्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विरोधक साफ होतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र त्यांच्या या बालेकिल्लात महायुतीने वीस विधानसभेच्या जागा मिळवल्या आहेत. महायुतीने विरोधकांच्या टिकऱ्या उडवल्या आहेत. त्यामुळे आता पक्षाचा विस्तार करायचा आहे.
पक्षाला उभारी देताना विशेष कार्यकारी अधिकारी, महामंडळ, समिती असे विविध 21 मंडळ आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पक्षाची वाटचाल ही तेजस्वी होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.