Mayawati news : पक्षप्रमुखांनी सांगताच माजी खासदाराचा थेट राजकारणातून संन्यास; काही तासांतच जावयालाही पक्षातून डच्चू

Akash Anand expelled, BSP, Siddharth Ashok, UP political news : मायावतींच्या एका आदेशाने बहुजन समाज पक्षात भूकंप; माजी खासदार अशोक सिध्दार्थांचा संन्यास आणि भाचा आकाश आनंदला पक्षातून बाहेरचा रस्ता.
BSP Party
BSP PartySarkarnama
Published on
Updated on

Bahujan Samaj Party politics : उत्तर प्रदेशच्या राजकारणात गुरूवारी मोठी घडामोड घडली. मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश येत असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी धक्कादायक निर्णय घेतला.

त्यांनी आपला भाचा आकाश आनंद यांना थेट पक्षातूनच डच्चू दिला आहे. काही तास आधीच आकाश आनंद यांचे सासरे व माजी खासदार अशोक सिध्दार्थ यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती.

मागील काही दिवसांत बहुजन समाज पक्षात मोठी उलथापालत पाहायला मिळाली. मायावती यांनी ३ सप्टेंबर रोजी लखनऊ येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयकपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले होते. ते अजूनही राजकीय अपरिपक्व असल्याचे मायावती म्हणाल्या होत्या.

मायावती यांनी बुधवारी (ता. ९) आकाश आनंद यांचे सासरे आणि राज्यसभेचे माजी खासदार अशोक सिध्दार्थ यांना राजकारणातून निवृत्त होण्यास सांगितले होते. मायावती यांनी त्यांच्या निवृत्तीचा संबंध जावयाच्या राजकीय वाटचालीशी जोडला होता.

मागील काही वर्षांपासून त्यावरून संघर्ष सुरू आहे. अखेर अशोक सिध्दार्थ यांनी मायावतींच्या विधानानंतर गुरूवारी सोशल मीडियात पोस्ट करत आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

BSP Party
Raghav Chadha News : राघव चड्ढांचा डाव त्यांच्यावरच उलटला; निवडणूक आयोगाच्या खुलाशाने पर्दाफाश, पाच मुद्द्यांमध्ये समजून घ्या प्रकरणाचे गुढ...

भावनिक पोस्टमध्ये अशोक सिध्दार्थ यांनी मायावतींचा आदेश म्हणजे कुटुंबीय आणि राजकीय संबंधांपेक्षा, जावई आणि सासऱ्याच्या संबंधांपेक्षाही अधिक महत्वाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचा संबंध आकाश आनंद यांच्या पुनर्वसनाशी जोडू नये, अशी विनंतीही मायावतींना केली होती.

BSP Party
Top 10 News : अमृता फडणवीसांचं निमंत्रण जरांगे पाटलांनी स्वीकारलं, विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस, सुनेत्रा पवार अन् शहांची भेट, वाचा Top Ten राजकीय घडामोडी...

अशोक सिध्दार्थ यांच्या या घोषणा काही तास उलटत नाहीत तोच मायावती यांनीही सोशल मिडियात एक पोस्ट करत आकाश आनंद यांना पक्षातून पूर्णपणे मुक्त करण्यात आले असल्याचे जाहीर केले. तसेच अशोक सिध्दार्थ यांचा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय उशिरा घेतला योग्य निर्णय असल्याचेही मायावतींनी म्हटले आहे. मात्र, या निर्णयानंतरही मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षातून मुक्त केल्याने बहुजन समाज पक्षात आणि राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com