BSP Chief Mayawati : धूर, गोंधळ अन् कार्यकर्त्यांची पळापळ! भर पत्रकार परिषदेत मायावतींसमोर नेमकं काय झालं?

what happened during mayawati press conference : लखनऊमध्ये मायावतींच्या पत्रकार परिषदेदरम्यान शॉर्ट सर्किटमुळे धूर पसरला. कार्यकर्ते व सुरक्षारक्षकांमध्ये गोंधळ उडाला.
Mayawati press conference incident
Mayawati press conference incidentSarkarnama
Published on
Updated on

Smoke during Mayawati press conference: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी लखनऊ येथील पक्ष कार्यालयात आपल्या 70व्या वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान एक मोठी दुर्घटना टळली. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक शॉर्ट सर्किटमुळे भिंतीवरील लाईटमधून धूर निघू लागला. काही क्षणांसाठी तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

धूर दिसताच तिथे उपस्थित असलेले सुरक्षाकर्मी तातडीने सतर्क झाले. त्यांनी लगेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्प्रेचा वापर केला. वेळेत उपाय केल्यामुळे आग पसरण्यापूर्वीच धोका टळला.

या घटनेत कोणालाही इजा झाली नाही आणि कार्यक्रम पुन्हा सुरळीतपणे पार पडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्व काही आटोक्यात आले.

mayawati news
mayawati newsSarkarnama

या पत्रकार परिषदेत मायावती यांनी आपल्या वाढदिवसाबाबत भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, आज माझा 70वा वाढदिवस असून तो वैयक्तिक आनंदाचा दिवस न मानता जनकल्याणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या महिन्यात देशभरात हा दिवस साधेपणाने आणि लोकांच्या हितासाठी उपक्रम राबवून साजरा केला जातो. बहुजन समाज पार्टीने सुरू केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळाला असून, त्यामुळे जनतेच्या मनात पक्षाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Mayawati press conference incident
Election Officer : 'बायको असली म्हणून काय झालं', निवडणूक अधिकाऱ्याने थेट पत्नीच्याच नावाने काढली नोटीस, वाचा नेमकं काय घडलं

मायावती यांनी सांगितले की, ज्या गुरूंनी आणि महापुरुषांनी समानतेचा मार्ग दाखवला, त्यांना त्या नमन करतात. दलित, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या सन्मानासाठी आयुष्य समर्पित केले असून ही लढाई पुढेही सुरू राहील. मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही आणि कोणत्याही लालचात येणार नाही, असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com