Mayawati News : मायावतींकडून भाच्याला मोठा झटका, आता भावासाठी पायघड्या!

Bahujan Samaj Party Meeting Akash Anand News : आनंद कुमार यांच्यासह राज्यसभेचे कासदार रामजी गौतम यांच्यावरही समनव्यक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Mayawati
MayawatiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांना जोरदार झटका दिला आहे. त्यांना पक्षातील सर्व पटांवरून हटवण्यात आले असून पक्षापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

मायावती यांनी रविवारी पक्षाच्या देशभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही पदांवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार दोन वे राष्ट्रीय समन्वयक नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये एक नाव आकाश आनंद यांचे वडील आनंद कुमार यांचे आहे. ते पक्षाचे महासचिवही आहेत.

Mayawati
BJP Minister : लोकांना सरकारकडे भीक मागण्याची सवय लागलीय! भाजपच्या मंत्र्यांचे बेताल वक्तव्य

आनंद कुमार यांच्यासह राज्यसभेचे कासदार रामजी गौतम यांच्यावरही समनव्यक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मायावतींनी घेतलेल्या या महत्वाच्या बैटकीला आकाश आनंद उपस्थित नव्हते. त्यांना मायावती यांनी डिसेंबर 2023 मध्ये आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले होते. तसेच राष्ट्रीय समन्वयक हे पदही देण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मायावती यांनी आपला निर्णय बदलला होता. आकाश आनंद यांना दोन्ही पदांवरून हटवण्यात आले होते. यामागे त्यांची वादग्रस्त विधाने कारणीभूत ठरली, अशी चर्चा आहे. आकाश आनंद यांनी भाजपचा सरकारल दहशतीचे सरकार असे म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

Mayawati
Donald Trump : ट्रम्प जग 'मुठीत' घ्यायला निघाले; 38 दिवसांत पाच देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भिडले

काहीवेळा भाषणादरम्यान बोलत असताना आकाश यांच्या तोंडून शिवराळ शब्द उच्चारण्यात आले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. मायावती यांनीही नाराजी व्यक्त करताना त्यांचे कान टोचले होते. ते परिपक्व नसल्याचे सांगत मायावती यांनी आकाश हे राजकीयदृष्ट्या पूर्ण परिपक्व होईपर्यंत त्यांना पक्षातील जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले जाईल, असे सांगितल होते.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com