मायावतींचे 'दलित कार्ड' ; अखिलेश यांना त्यांच्या घरातच घेरणार

मायावतींचा हा डाव किती मजबूत आहे, हे १० मार्चला निकालानंतर समजेल. करहल आणि जसवंत नगर या दोन्ही जागा सपाच्या पारंपारिक जागा आहेत.
akhilesh yadav,mayawati
akhilesh yadav,mayawatisarkarnama

लखनैा : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (up assembly) बहुजन समाज पक्षानं (bsp)उमेदवारांच्या दोन याद्या घोषीत केल्या आहेत. यात १८ मागासवर्गीय, १७ दलित तर १५ सवर्ण उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत सहा तर दुसऱ्या यादीत ५३ उमेदवारांना तिकीट दिल्याची घोषणा बसपानं केली आहे. बसपाच्या प्रमुख मायावती (mayawati) यांनी या नावांची घोषणा केली आहे.

बसपा सुप्रीमो मायावती यांनी सपाचे (sp) प्रमुख अखिलेश यादव (akhilesh yadav) आणि शिवपाल सिंह यादव (shivpal yadav) यांना त्यांच्या घरात घेरण्याचा डाव टाकला आहे. या दोन्ही सर्वसामान्य जागांवर दलित उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना आव्हान दिले आहे. अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढवित आहेत. 2009मध्ये ते कन्नौज लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.मायावती (Mayawati) यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.

akhilesh yadav,mayawati
'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' 'धर्मवीर' लवकरच रुपेरी पडद्यावर

बसपाने या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यांच्या विरोधात डॅा. महेश चंद्र वर्मा यांना रिंगणात उतरवलं आहे. मायावतींचा हा डाव किती मजबूत आहे, हे १० मार्चला निकालानंतर समजेल. करहल आणि जसवंत नगर या दोन्ही जागा सपाच्या पारंपारिक जागा आहेत.

बसपा आणि सपाचा वाद जगजाहीर आहे. त्यानंतरही २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मायावती यांनी सपा सोबत युती केली होती. पण लोकसभा निवडणुकीनंतर ही युती तुटली. मायावती आता उत्तरप्रदेशात स्वबळावर विधानसभा निवडणुक लढवित आहेत. अखिलेश यादव हे करहल, तर शिवपाल यादव हे जसवंतनगर येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

akhilesh yadav,mayawati
आझम खान कारागृहातूनच निवडणुकीच्या रिंगणात

बहुजन समाज पक्षानं जाहीर केलेल्या यादीत बहुतांश उमेदवार हे अन्य पक्षातून बसपामध्ये आले आहेत. समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन आलेले कुंदरकीचे आमदार हाजी रिजवान यांना बसपानं कुंदरकीमधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर सपा सोडून आलेले माजी आमदार मूलचंद चैाहान यांना धामपूर विधानसभेचे तिकीट बसपानं दिलं आहे.

akhilesh yadav,mayawati
''मोदींच्या दबावामुळे टि्वटरनं फॉलोअर्स कमी केले ; राहुल गांधींना मिळालं हे उत्तर

मायावती यांनी गुरुवारी या नावांची घोषणा केली. त्यांनी एकाच दिवसात दुसरी यादी जाहीर केली. यात हाथरस, फिरोजाबाद, कासगंज, एटा, मैमपुरी, फरुर्खाबाद, कन्नौज, इटावा, औरैया, कानपुर ग्रामीण , कानपुर शहर , जालौन, झांसी, ललितपुर, हमीरपुर, महोबा येथील उमेदवारांच्या नावांची घोषणा मायावतींनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com