
नवी दिल्ली : कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टि्वटला पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. माझ्या फॉलोअर्सची संख्या मर्यादित करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी केला आहे. गांधींच्या या आरोपाना टि्वटनं उत्तर दिलं आहे. ''मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटर माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे,'' असा आरोप राहुल गांधींनी टि्वटवर केला आहे.
गेल्या २७ डिसेंबर रोजी राहुल गांधींनी टि्वटला पत्र लिहिलं होते. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॉग्रेसचे नेते शशि थरुर यांच्या टि्वटची माहिती देत विश्लेषण केलं होते.
राहुल गांधींच्या मतानुसार, ऑगस्ट 2021 मध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 54,803 ने कमी झाली आहे, तर सप्टेंबरमध्ये 1,327, ऑक्टोबरमध्ये 2,380 आणि नोव्हेंबरमध्ये 2,788 ने घट झाली आहे. या काळात पीएम मोदींच्या फॉलोअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्यांची संख्या जवळपास 30 लाख आहे. सध्या राहुल गांधींच्या फॉलोअर्सची संख्या १९.६ मिलियन आहे.
'‘माझ्या मते भारतातील मुक्त आणि निष्पक्ष भाषणावर अंकुश ठेवण्यासाठी ट्विटरची अनावधानाने केलेली गुंतागुंत दर्शवते. मला ट्विटर इंडियाच्या लोकांनी कळवले आहे की, माझा आवाज बंद करण्यासाठी त्यांच्यावर सरकारचा प्रचंड दबाव आहे. यामुळे Twitter सारख्या कंपन्यांच्या प्रमुखपदी असलेल्या लोकांवर मोठी जबाबदारी येते, मला त्याकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे,'' असे राहुल गांधी यांनी टि्वटरच्या पराग अग्रवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
''अलीकडच्या काही दिवसांत ट्विटरने आपले नियम कडक केले आहेत. अनेक ट्विटर अकाउंट बंद केल्यानेही त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे अनेकांच्या फॉलोअर्सची संख्या कमी झाली.
प्लॅटफॉर्म मॅनिप्युलेशन आणि स्पॅमवरील आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल आम्ही दर आठवड्याला लाखो ट्विटर खाती काढून टाकतो. अधिक तपशिलांसाठी तुम्ही नवीन Twitter पारदर्शकता केंद्र अपडेट्स पाहू शकता. तथापि, काही खात्यांमध्ये थोडासा फरक दिसून येतो. पण काही खात्यांमध्ये हा आकडा जास्त असू शकतो,'' असे टि्वरनं राहुल गांधींना स्पष्टीकरण दिलं आहे.
''फॉलोअर्सची संख्या अर्थपूर्ण आणि अचूक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेरफार आणि स्पॅमसाठी Twitter कडे झीरो-टॉलरन्स दृष्टिकोन आहे. आम्ही मशीन लर्निंग टूल्सद्वारे स्पॅम आणि दुर्भावनापूर्ण सामग्रीशी धोरणात्मक आणि व्यापकपणे मुकाबला करतो. निरोगी प्लॅटफॉर्म आणि विश्वसनीय खाती सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतो,'' असे टि्वटनं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.