MLA Vs Mayor : महिला आमदारांनी हात जोडले, पण महापौरांनी जुमानले नाही अन् बुलडोझर चालवला! घटनेचा Video व्हायरल...

SP MLA Naseem Solanki Mayor Pramila Pandey Kanpur Incident Video Viral : कानपूरमधील सीसामऊ भागातील एका नाल्यात पडून लहान मुलाचा मृत्यू झाला होता.  
MLA Vs Mayor
MLA Vs MayorSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : महिला आमदार आणि महिला महापौरांमधील एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी टीमसह आलेल्या महापौरांसमोर स्थानिक भागातील महिला आमदार हात जोडत कारवाई न करण्याची विनवणी करत होत्या. पण महापौरांनी त्यांच्या विनंती न जुमानता धडक कारवाई केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

कानपूरमधील सीसामऊ भागातील एका नाल्यामध्ये पडून काही दिवसांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल होता. या घटनेनंतर कानपूर महापालिकेवर टीका सुरू झाली होती. त्यानंतर महापौर प्रमिला पांडेय यांनी बुलडोझर कारवाईचे संकेत दिले. शुक्रवारी सकाळी त्या संपूर्ण टीमसह अतिक्रमणाच्या ठिकाणी पोहचल्या. बुलडोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केल्यानंतर तिथे समाजवादी पक्षाच्या स्थानिक आमदार नसीम सोलंकी तिथे आल्या.

आमदार व महापौर समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या थोडा वादही झाली. पण नसीम सोलंकी यांनी महापौरांना एक आठवड्यांची मुदत देण्याची मागणी केली. पण महापौरांनी त्यांना बेटा, बहू असे म्हणत एक सेंकदही वेळ देणार नाही, असे कडक शब्दांत सांगितले. तुम्ही इथून जा, तुम्ही इथे थांबल्यास लोक दबाव टाकतील, असे म्हणत आमदारांना जाण्यासही सांगितले.

महापौरांकडून अत्यंत प्रेमाणे आमदारांना समजावून सांगितले जात होते. त्यामुळे सोलंकी याही थोड्या नरमल्या आणि मुदत मागतच राहिल्या. पण महापौर काही ऐकण्यास तयार नव्हत्या. अखेर त्यांनी आमदारांना जाण्यास सांगून पुन्हा कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांनी पोलिसांनीही नागरिकांना त्याठिकाणाहून हटवले.

याबाबत बोलताना नसीम सोलंगी म्हणाल्या की, नाल्यावर अतिक्रमण असेल तरी तेथील लोकांसाठी काही दिवसांची मुदत मागितली होती. कारण थंडीच्या दिवसांत या लोकांचे हाल होऊ नयेत. कालच नोटीस दिली आणि आज लगेच कारवाई करण्यात आली. नोटिस दिल्यानंतर थोडा कालावधी द्यायला हवा होता.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com