MCD Election Result : मुस्लिम मतदारांनी वाचवली काँग्रेसची थोडीबहुत प्रतिष्ठा!

MCD Election : काँग्रेसच्या ७ जागा मुस्लिम उमेदवारांनी राखल्या आहेत.
MCD Election congress
MCD Election congressSarkarnama

दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित (MCD) निवडणुकांचे संपूर्ण निकाल आता हाती आले आहेत. दिल्ली महानगरपालिकेत मागील सलग पंधरा वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र आता आम आदमी पक्षाने सत्ता खेचून आणले आहे. भाजपकडून सत्ता निसटली आहे. दिल्ली महानगरपालिकेतील एकूण 250 जागांपैकी आपने 134 जागा जिंकत बहुमताला गवसणी घातली. या खालोखाल भाजपला 104 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा काँग्रेसला आपल्या या 31 जागाही राखता आल्या नाहीत. काँग्रेसला यावेळी केवळ 9 जागा जिंकता आल्या. यापैकी ७ जागा मुस्लिम उमेदवारांनी या जागा राखल्या आहेत. मुस्लिम उमेदवारांनीच या निवडणुकीत काँग्रेसची थोडी बहुत प्रतिष्ठा वाचवली आहे. काँग्रेसने जिंकलेल्या 9 जागांपैकी 7 जागेवर मुस्लिम उमेदवार आहेत.

MCD Election congress
MCD Election : एमआयएमला एक-दोन जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्ही समाधानी..

मुस्लिमबहुल प्रभाग क्र 188 मधून काँग्रेसचे उमेदवार अरीबा खान जिंकून आले. याजागी अरिबा खान यांनी, आम आदमी पक्षाचे उमेदवार वाजिद खान यांचा पराभवाचा धक्का दिला.ओखलाचे माजी आमदार मोहम्मद खान यांची मुलगी खान आहेत. सीलमपूरच्या प्रभाग क्रमांक 227 मधून शगुफ्ता चौधरी विजयी झाले. कबीर नगर वॉर्ड क्रमांक 234 मधून काँग्रेसच्या झरीफ हे विजयी झाले आहेत. शास्त्री पार्क वॉर्ड क्रमांक 213 मधून समीर विजयी झाले आहेत.

मुस्तफाबाद येथील प्रभाग क्रमांक 243 मधून सबिला बेगम विजयी झाले. ब्रिजपुरी प्रभाग क्रमांक 245 मधून काँग्रेसच्या नाझिया खातून विजयी झाल्या. आया नगरमधून शीतल विजयी झाल्या. कादीपूरमधून काँग्रेसच्या रुमा राणा यांनी आपचे सुदेश गेहलोत यांचा पराभव केला. कांझावालामध्ये काँग्रेसच्या जोगिंदर यांनी भाजपच्या वरुण सेनी यांचा पराभव केला.

MCD Election congress
Border Dispute : सीमाप्रश्न वादात अभिजित बिचुकलेंची उडी.. म्हणाले, लक्ष घालावे लागेल

एकूण 6 मुस्लिमबहुल विधानसभ मतदारसंघात येणाऱ्या 23 वॉर्डांपैकी आम आदमी पार्टीला फक्त 8 वॉर्ड जिंकता आले.बल्लीमारनच्या 3 प्रभागात आम आदमी पक्षाने 2 तर भाजपने एक जागा जिंकली. मुस्तफाबाद विधानसभेच्या पाचही प्रभागात आम आदमी पक्षाचा पराभव झाला.सीलमपूर विधानसभेच्या चारही प्रभागात आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. ओखला विधानसभेच्या 5 पैकी 4 वॉर्डात 'आप'ला पराभवाचा दणका बसला. केवळ एक जागा त्यांना जिंकता आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com