MCD Election : एमआयएमला एक-दोन जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्ही समाधानी..

Aimim : आमच्या उमेदवारांना जी मते मिळाली आहेत, ती समाधानकारक आहेत.
Mp Imtiaz Jalil News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Mp Imtiaz Jalil Reaction News : दिल्ली महापालिका निवडणुकीत आप आणि भाजपसोबतच एमआयएमची देखील चर्चा होती. पण निवडणूक निकालानंतर फक्त आपचीच चर्चा सुरू आहे. Aimim एमआयएमने दिल्लीत निवडक १३ जांगावर उमेदवार उभे केले होते. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एक सभा, रोड शो दिल्लीच्या गल्लीबोळातून केला होता. तर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची फौज घेवून दिल्लीत दाखल झाले होते.

Mp Imtiaz Jalil News, Aurangabad
Aurangabad Municipal Corporation: निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराचे आरोप ठाकरे गटाला महागात पडणार ?

परंतु एमआयएमला दिल्ली महापालिकेत एकही जागा जिंकता आली नाही. आम्हाला एक-दोन जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्ही इथे आणखी काम करू, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी निवडणुक निकालानंतर दिली आहे. आमचे उमेदवार विजयी झाले नसले, तरी त्यांना मिळालेली मते समाधानकारक असल्याचेही ते म्हणाले. (Aurangabad)

दिल्ली महापालिका निवडणुकीत एमआयएमने निवडक वार्डांमध्ये उमेदवार देवून त्यांच्यासाठी प्रचाराची राळ उठवून दिली होती. ओवेसी गुजरात विधानसभेच्या निवडणुक प्रचारात व्यस्थ असतांना त्यांनी एक दिवस दिल्ली महापालिकेसाठी दिला होता. तर उर्वरित प्रचाराची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील व त्यांच्यासोबत आलेल्या मराठवाड्यातील टीमवर सोपवली होती.

इम्तियाज जलील यांनी प्रचार सभा, रोड शो करत चांगली वातावरण निर्मिती केली. त्यांच्या सभा आणि रोड शोला मोठी गर्दी देखील झाली. पण या गर्दीचे रुपांतर मतदानात मात्र झाले नाही. या संदर्भात सरकारनामाशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही खूप मेहनत घेतली होती, आमचे कार्यकर्ते प्रचारात झोकून देवून काम करत होते.

लोकांचा प्रतिसाद देखील चांगला होता. त्यामुळे किमान एक-दोन जागा निवडून येतील अशी अपेक्षा होती, पण ते घडले नाही. परंतु आमच्या उमेदवारांना जी मते मिळाली आहेत, ती समाधानकारक आहेत. त्यामुळे आम्ही निराश नाही, यापुढे देखील दिल्लीत पक्षाचे काम सुरूच राहील. या निवडणुकीतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com