Border Dispute : सीमाप्रश्न वादात अभिजित बिचुकलेंची उडी.. म्हणाले, लक्ष घालावे लागेल

Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न येत्या काळात सुटायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
Abhijit Bichukale
Abhijit Bichukalesarkarnama

सातारा : शेवटी मलाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात लक्ष घालावे लागेल, अशी प्रतिक्रिया बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी दिली आहे. तर भाजपमधल्या काही लोकांना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडले असून ते मोदींना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मोदींनी काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.

राज्यात सध्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमवाद चांगला पेटला आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नानं राज्यातील राजकीय घडामोडींवरही परिणाम झाले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांत कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आले आहे. या वादात राजकिय नेत्यांनी ऐकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. या वादात आता बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही उडी घेतली आहे.

सोशल मीडियावर बिचुकलेंची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. बिचुकले म्हणाले, शेवटी मलाच महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न वादात लक्ष घालावे लागेल. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलीच दखल घेतली आहे. बिचुकले म्हणाले, भाजपमधल्या काही लोकांना पंतप्रधानांचं स्वप्न पडलं असून ते आता मोदींना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा मोदींना सल्ला आहे, त्यांनी काळजी घ्यावी.

Abhijit Bichukale
अभिजित बिचुकले म्हणतात.. मला फक्त एक दिवस मुख्यमंत्री करा...

बिचुकलेंनी म्हटलंय की, कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही. तर, छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. केवळ जाणार नाहीत तर तिथे आंदोलनही करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी बिचुकलेंना दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

Abhijit Bichukale
राष्ट्रपती निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांची अशी आहे रणनीती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न येत्या काळात सुटायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या ज्याप्रकारे सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहे. त्याकडे बिचुकलेंनी लक्ष वेधले असून ते म्हणाले, मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही ही असली वक्तव्य खपवून घेणार नाही.

Abhijit Bichukale
Udayanraje Bhosale : इंग्लंडमधील भवानी तलवारीबाबत उदयनराजे भोसले म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com