ओमिक्रॉन प्रत्येक घरात धडकणार, असा इशारा देणारे बिल गेट्स आता कोरोनाबाधित

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी जगाला दिला होता धोक्याचा इशारा
Bill Gates Latest News, Covid News Updates
Bill Gates Latest News, Covid News Updates Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या प्रकाराने जगभरात थैमान घातले होते. त्यावेळी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना जगाला ओमिक्रॉनबाबत धोक्याचा इशारा दिला होता. ओमिक्रॉन प्रत्येक घरात धडकेल, असे त्यांनी म्हटले होते. आता बिल गेट्स यांनाच कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनीच याची माहिती ट्विटरवर दिली आहे. (Bill Gates Latest News)

बिल गेट्स यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या ते घरीच विलगीकरणात आहेत. त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असून, ते तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. त्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असून, ते योग्य ती खबरदारी घेत आहेत. गेट्स यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. दरम्यान, बिल गेट्स यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाबाबत धोक्याचा इशारा दिला होता. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराबाबत त्यांनी दिलेला हा इशारा खरा ठरला होता.

Bill Gates Latest News, Covid News Updates
आयपीएस त्रिपाठी अडचणीत! आधी निलंबन अन् आता लुकआऊट नोटीस

गेट्स यांनी त्यावेळी म्हटले होते की, जगभरात ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग चिंताजनक आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर माझी पूर्वनियोजित सहलही मी अखेर रद्द केली आहे. माझ्या जवळच्या मित्रांना विषाणूची बाधा झाली आहे. आता कुठे आपले आयुष्य रुळावर आले होते. परंतु, लगेचच आपण कोरोना महामारीच्या सर्वांत वाईट कालखंडात प्रवेश करीत आहोत. प्रत्येकाच्या घरात ओमिक्रॉन धडकणार आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने पसरत आहे. विषाणूंच्या इतिहासात आतापर्यंत एवढ्या वेगाने कोणत्याही विषाणूचा प्रसार झाला नव्हता. तो लवकरच प्रत्येक देशात पोचेल.

Bill Gates Latest News, Covid News Updates
राहुल गांधींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! हार्दिक पटेलांची नाराजी दूर अन् नेत्यांनाही चाप

दुसऱ्या महामारीचाही इशारा

बिल गेट्स यांनी ओमिक्रॉन संसर्गावेळी दिलेला धोक्याचा इशारा खरा ठरला होता. ओमिक्रॉन हा जगभरात सगळीकडे पसरेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी जगाला नव्या महामारीचा धोक्याचा इशारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की, भविष्यात येणारी ही महामारी कोरोना विषाणूमुळे येणार नसून एका वेगळ्या संसर्गामुळे होईल. कोरोनावरील लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आता कोरोनापासून गंभीर संसर्ग होण्याचा धोका आता अतिशय कमी झाला आहे. आपल्याला आणखी एका साथीच्या रोगाला तोंड द्याव लागणार आहे. पुढील वेळी रोगास कारणीभूत ठरणारा घटक वेगळा असणार आहे. प्रामुख्याने वृद्ध, लठ्ठपणा किंवा मधुमेह असणाऱ्यांना गंभीर रोगाचा धोका हा असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com