गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत नाराजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर राजकारण तापलं आहे. पटेल हे पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यातच त्यांनी भाजपचं (BJP) तोंडभरून कौतुक केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. (Hardik Patel Latest News in Marathi)
गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राहुल गांधी राज्यात दाखल झाले आहेत. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी यांनी हार्दिक पटेल यांची भेट घेतली. राहुल यांच्यासोबत मंचावरही ते दिसले. त्यांची नाराजी दूर करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. याचवेळी पक्षात वरचढ नेत्यांनाही राहुल गांधींनी चाप लावला आहे. यासाठी काँग्रेसचे प्रभारी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची खेळी राहुल यांनी खेळली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हार्दिक पटेल यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला होता. मात्र, त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली होती. त्याचवेळी त्यांनी तोंडभरून भाजपचे कौतुक केले होते. यामुळे पटेल हे भाजपशी जवळीक साधू शकतात, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. ते म्हणाले होते की, भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.
पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी आतापर्यंत पक्षासाठी 100 टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.