Jairam Ramesh: राजीनाम्याची वेळ मोदींनी ठरवली'; जयराम रमेश म्हणाले, 'देवरांनी मला मेसेज...

Milind Deora Resignation:राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती
Milind Deora Resignation news
Milind Deora Resignation newsSarkarnam
Published on
Updated on

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. कालपर्यंत ते काँग्रेस सोडणार नाही, असे सांगत होते. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामागे कोण आहे, याबाबत चर्चा सुरु असताना काँग्रेसचे सरचिटणीस, ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी देवरा यांच्यासोबत झालेल्या संभाषणाविषयी माहिती दिली.

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रा सुरु होण्याआधीच राजीनामा दिला, या 'टायमिंग'वर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत जयराम रमेश यांनी देवरा यांच्या राजीमान्यांची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवली होती, असा दावा केला आहे.

देवरा यांच्यासोबत फोनवर बोलणं झाले होते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते लढण्यास इच्छुक होते. पण त्या ठिकाणी ठाकरे गटानं दावा केल्यामुळे ते नाराज होते. याबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

"शुक्रवारी सकाळी ८ वाजून ५२ मिनिटांनी मिलिंद देवरा यांनी मला मेसेज केला होता. त्यानंतर मी दुपारी २ वाजून ४७ मिनिटांनी रिप्लाय दिला. मी त्यांना राजीनाम्याचा विचार बदलण्यास सांगितले. परत दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी आमचे फोनवर बोलणं झाले. या जागेवर ठाकरे गटानं दावा केला आहे. याबाबत त्यांना चिंता होती, याबाबत मी राहुल गांधी यांच्यांशी चर्चा करावी, असे त्यांची इच्छा होती. मी राहुलजी यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांना सांगितले होते. पण देवरा यांचे हे सारे नाटक होते. त्यांनी याआधीच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. राजीनामा देण्याची वेळ मोदींनी ठरवली होती," असा दावा त्यांनी केला आहे.

जयराम रमेश यांनी मिलिंद देवरा याचे वडील मुरली देवरा यांचे नाव न घेता त्यांची आठवण काढली. "मुरली देवरा यांच्यासोबत असलेल्या अनेक वर्षांच्या सहवासाची मला आठवण येते. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जवळचे मित्र होते. पण प्रत्येक परिस्थितीत ते नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहत होते. तथास्तु!" असे टि्वट त्यांनी केलं आहे.

Milind Deora Resignation news
Mahayuti Melava: मनोमिलनापूर्वीच महायुतीत ठिणगी; पहिल्याच मेळाव्याला 'रासप'ने फिरवली पाठ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com