Akbaruddin Owaisi Threat News : 'पाच मिनिटे उरली आहेत, मी चाकू-गोळ्या.. ; ओवेसींची भर सभेत उघड धमकी!

Akbaruddin Owaisi Open Threat News : "कोणी मायका लाल जन्माला आला नाही, जो मला थांबवू शकेल..."
Akbaruddin Owaisi Threat News :
Akbaruddin Owaisi Threat News :Sarkarnama
Published on
Updated on

Telangana News : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पक्षाच्या मंचावरून जाहीरपणे पोलिसांना धमकीची भाषा वापरली आहे. पक्षाची निवडणूक प्रचार सभा सुरू असताना ती वेळेत आटोपून घ्या, अशा सूचना केल्याने ओवेसी यांनी पोलिसांनाच दमबाजी केली. तेलंगणा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. चंद्रयानगुट्टा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते प्रचार सभेला संबोधित करत होते. (Latest Marathi News)

“मी या आधी चाकू आणि गोळ्या शरीरावर झेलल्यामुळे मी कमजोर झालोय असं समजता का? माझ्यात अजूनही हिंमत आहे. सभा संपायला पाच मिनीट आणखी बाकी आहेत. मी अजून पाच मिनिटे बोलणार आहे. कोणी मायका लाल जन्माला आला नाही, जो मला थांबवू शकेल, असे ओवेसी म्हणाले.

पक्षाच्या मंचावरून त्यांनी उपस्थित लोकांना विचारलं की, "मी बरोबर बोललो की नाही? जर मी एक इशारा दिला तर तुम्हाला इथून काढता पाय घ्यावा लागेल की आम्ही तुम्हाला पळवून लावू? आम्हाला टार्गेट करण्यासाठी हे लोक इथे येतात," असे त्यांनी पोलिसांना उद्देशून म्हटलं.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com