Protest Against AIMIM News : संसदेत महिला विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजपच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या. (Women Reservation) महिला मोर्चातर्फे क्रांती चौकात निदर्शने करत ओवेसी आणि इम्तियाज यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे पाचदिवसीय विशेष अधिवेशन बोलावले होते. (BJP) सत्ताधारी आणि विरोधक अशा सगळ्याच राजकीय पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान केले. परंतु ओवेसी आणि इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी महिला आरक्षणामध्ये मुस्लिम आणि ओबोसींसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेत विधेयकांच्या विरोधात मतदान केले.
महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत भाजपच्या महिला मोर्चाने आज एमआयएमच्या या दोन्ही खासदारांच्या विरोधात निदर्शने करत आपल्या राग व्यक्त केला. (AMIM) महिलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याला बांगड्याही भरल्या. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांच्या मार्गदर्शनाखील हे आंदोलन करण्यात आले.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक सादर केले. समस्त नारी शक्तीचा सन्मान या माध्यमातून त्यांनी केला. या विधेयकाला सर्वपक्षीय समर्थन मिळाले, प्रचंड बहुमताने ते लोकसभा आणि राज्यसभेतही संमत झाले. परंतु या विधेयकांच्या विरोधात २ मते पडली.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी भाजपच्या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. क्रांती चौकात शेकडो महिलांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात प्रचंड घोषणा देत त्यांच्या पुतळ्याला बांगड्या घातल्या. गाढवाच्या गळ्यात त्यांचा फोटो घालून त्यांच्या महिलाविरोधी वृत्तीचा निषेध केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.