Water Shortage News : दिल्लीमध्ये पाणीचंटाई आहे. या पाणीटंचाईचा फटका नवीन महाराष्ट्र सदनाला देखील बसला आहे. येथे मुक्कामी असणाऱ्या एका केंद्रीय मंत्र्याला चक्क मिनरल पाण्याने अंघोळ करावी लागली, या संदर्भातील वृत्त 'साम टीव्ही'ने दिले आहे.
महाराष्ट्रात सदनात येणाऱ्या पाहुण्यांना पाणीटंचाईचा फटका बसत होता. मात्र आता केंद्रीय मंत्र्याला देखील पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या. केंद्रीय मंत्र्याला फिल्टरच्या पाणी बाटलीतील पाण्याने अंघोळ करावी लागली.
राजधानी नवी दिल्लीत Delhi पाणीटंचाई आहे. काल (रविवार) संध्याकाळ पासून महाराष्ट्र सदनातील पाणी देखील बंद झाले आहे. एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्र सदनात मुक्कामाला होते. मात्र, त्यांच्या अंघोळीसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने फिल्टरच्या पाणी बाटलीतील पाण्याने त्यांना अंघोळ करावी लागली.
नवी दिल्लीत पाणीटंचाई असताना त्याचा फटका महाराष्ट्र सदनाताल बसणार हे निश्चित होते. मात्र, महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोणतेही नियोजन केलेले दिसत नाही. त्यांच्या या कारभाराचा फटका केंद्रीय मंत्र्यांला Minister बसला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.