NitishKumar Security : मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सुरक्षेत चूक; कार्यक्रम आटोपून निघत असतानाच...

NitishKumar Politics News : ...आणि मग मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे रवाना झाला. ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
NitishKumar Security
NitishKumar SecuritySarkarnama
Published on
Updated on

Bihar Political News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. पाटणामधील दोन शासकीय इमारतींचे उद्घाटन करण्यासासाठी नितीशकुमार आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा त्यांचा वाहन ताफा निघाला. त्याच दरम्यान कार्यक्रमस्थळी रस्त्यावर उभारलेली भली मोठी कमान हवेमुळे कोसळली आणि एकच गोंधळ उडाला. ही घटना मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सुरक्षेमधील मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे.

कमान कोसळल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत, ती कमान सरळ केली. ज्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमारांचा(NitishKumar ) वाहन ताफा तेथून सुरक्षितपणे मोकामाकडे मार्गस्थ झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

NitishKumar Security
Chirag Paswan : चिराग पासवान यांना रोखण्यासाठी भाजपचे ‘पारस’ अस्त्र? नितीश कुमारांनाही भेदणार...

व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, जसा मुख्यमंत्री नितीशकुमारांचा ताफा कार्यक्रमस्थळावरून निघाला अन् स्वागत कमानीजवळ पोहचला, तशी ती कमान अचानक कोसळली. यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा काही काळ थांबून होता. यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थिती जदयू(JDU) कार्यकर्ते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही कमान तातडीने हटवली आणि मग मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे रवाना झाला.

NitishKumar Security
Mahavir Phogat and Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या राजकीय आखाड्यातील 'एन्ट्री'वर गुरू महावीर फोगाट नाराज, म्हणाले...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. तब्बल आठ महिन्यानंतर हे दोन्ही नेते भेटल्याने चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधी ही भेट झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com