Mahavir Phogat and Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या राजकीय आखाड्यातील 'एन्ट्री'वर गुरू महावीर फोगाट नाराज, म्हणाले...

Vinesh Phogat will contest Haryana Vidhan Sabha Election : विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, हरियाणच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.
Mahavir Phogat and Vinesh Phogat
Mahavir Phogat and Vinesh PhogatSarkarnama
Published on
Updated on

Haryana Assembly elections : ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारी धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगाट हिने नुकताच काँग्रेसमधअये प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी तिने हा निर्णय घेतला आहे. मात्र तिच्या निर्णयावर तिचे काका आणि तिचे गुरू महावीर सिंह फोगाट यांना विनेश फोगाट हिने घेतलेला निर्णय आवडलेला नाही.

महावीर फोगाट हिचे म्हणणे आहे की, 'मी विनेशच्या राजकारणातील प्रवेशाच्या विरोधात आहे. माझी इच्छा आहे की तिने आणखी एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळलं पाहीजे.'

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी मागील आठवड्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याआधी विनेश आणि बजरंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली होती.

यानंतर ते काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, एआयसीसी सरचिटणीस प्रभारी हरियाणा दीपक बाबरिया, हरियाणा काँग्रेस(Congress) प्रमुख उदयभान आणि काँग्रेसचे मीडिया अन् प्रचार विभाग प्रमुख पवन खेडा यांच्या उपस्थितीत एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसमध्ये सहभागी झाले.

Mahavir Phogat and Vinesh Phogat
Vinesh Phogat : अखेर ठरलं! विनेश फोगाट अन् बजरंग पुनिया आता राजकीय मैदान गाजवणार; मतदारसंघही ठरले...

एवढंच नाहीतर विनेश फोगाट(Vinesh Phogat) हरियाणच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. यानंतर विनेशने तिच्या पतीचे मूळ गाव बक्ता खएडा येथून जुलाना विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानास सुरूवात केली आहे. यावेळी विनेशने रोड शो सुद्धा केला.

पक्षात प्रवेश केल्यानंतर विनेश फोगाट म्हटले होते की, भाजपा बृजभूषण शरण सिंहचे समर्थन करत होती. तर काँग्रेसने या काळात पैलवानांचे समर्थन केले. मी देशातील नागरीक अन् माध्यमांचे आभार व्यक्त करते. तुम्ही माझ्या कुस्तीच्या प्रवासात मला साथ दिली. मी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त करते, कठीण काळ तुम्हाला दाखवून देतो की तुमच्यासोबत कोण आहे.

Mahavir Phogat and Vinesh Phogat
Vinesh Phogat : विनेश फोगाट काँग्रेसमध्ये; नव्या इनिंगच्या सुरूवातीलाच भाजपविरोधात थोपटले दंड

तसेच, जेव्हा आम्हाला रस्त्यावर ओढल्या गेलं, तेव्हा भाजप(BJP) सोडून सर्व पक्ष आमच्यासोबत उभा होते. मी एक नवीन इनिंग सुरू करत आहे. माझी इच्छा आहे की खेळाडूंना ते सर्व सहन करावं लागू नये, ज्यातून आम्हाला जावं लागलं. तिने हेही सांगितलं की आम्ही घाबरणार नाही आणि मागेही हटणार नाही. आमचा न्यायालयीन खटला सुरू आहे आम्ही त्यामध्येही जिंकू.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com