Shyam Rajak News : लालूंना झटका देणारे श्याम रजक अखेर 'या' पक्षात जाणार; मुहूर्तही ठरला!

Shyam Rajak will join JDU : पक्ष प्रवेशाच्या चर्चांबाबत सुरू असलेल्या चर्चांना स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करून दिला पूर्णविराम
Shyam Rajak
Shyam RajakSarakarnama
Published on
Updated on

RJD and JDU Politics News : राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते श्याम रजक अखेर जनता दल यूनायटेडमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले, त्यांनी स्वत: प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत याबाबतची घोषणा केली आहे. नुकतीच त्यांनी लालू प्रसाद यादव यांना झटका देत, आरजेडीची साथ सोडली होती.

श्याम रजक(Shyam Rajak) यांनी म्हटले की, राजद सोडत असताना मी आठ दिवसांचा वेळ घेतला होता आणि म्हटले होते की मी माझ्या फुलवारी येथील मतदारांचा सल्ला घेईन. मी सर्वांशी चर्चा केली, त्यावर तेथील नागरिकांचे म्हणणे आले की आपण जेडीयूमध्ये प्रवेश केला पाहीजे. त्यानंतर मी जेडीयूमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि पोस्टही केली की मी १ सप्टेंबर रोजी जेडीमध्ये प्रवेश करेल.

Shyam Rajak
Shyam Rajak News : 'मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए...' ; लालूंवर आरोप करत श्याम रजक यांचा 'RJD'ला झटका!

खरंतर श्याम रजक हे लालू प्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवाय ते राजदच्या सरचिटणीस पदावर होते. परंतु त्यांनी काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करत पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच ते पुन्हा जेदयूमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

Shyam Rajak
Shyam Rajak : लालू प्रसाद यादवांवर आरोप करत, 'RJD'ला धक्का देणारे श्याम रजक कोण?

श्याम रजक हे बिहार सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचे कळवले होते. विशेष म्हणजे पत्रामध्ये त्यांचा शायराना अंदाज दिसून आला, ज्याची सर्वत्र चर्चाही झाली.

'मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया। आप मोहरे चल रहे थे, मैं रिश्तेदारी निभा रहा था।' असं म्हणत श्याम रजक यांनी लालूंवर निशाणा साधला होता.

नेमकं कशामुळे श्याम रजक होते नाराज? -

असं बोललं जात आहे की, राज्यसभेवर पाठवलं न गेल्यामुळे श्याम रजक नाराज होते. त्यांच्यानुसार राष्ट्रीय जनता दलाने मनोज झा यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलं आहे. तेच श्याम रजक यांची जात धोबी समाजातून मुन्नी रजक यांना विधान परिषदेवर पाठवलं गेलं. राजकीय अभ्यासक हेहे म्हणत होते की श्याम रजक यांचे विधानसभा क्षेत्र फुलवारी शरीफ आहे. त्यामुळे आता ते पुन्हा एकदा जनता दल यूनायटेडमध्ये प्रवेश करून फुलवारी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच श्याम रजक यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांची(NitishKumar) भेटही घेतली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com